S M L

पेट्रोल दरवाढीचा राज्यभरात निषेध

15 मेपेट्रोलच्या दरवाढीच्या विरोधात पुण्यामध्ये आज भाजप आणि शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केली. पुण्यातील कसबा पेठेमधून सकाळी भाजप तर्फे बैलगाडीवरुन बाईक्सचा मोर्चा काढण्यात आला. पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर एक दिवस बैलगाडी वापरायची वेळ सर्व सामान्यांवर येईल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. कसबा गणपती पासून सुरुवात झालेला हा मोर्चा अलका टॉकिज चौकापर्यंत नेण्यात आला. पुण्यातील भाजपचे नगरसेवक विकास मठकरी यांनीही अशाच प्रकारच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. डेक्कन बस स्टॉप जवळुन सुरुवात झालेल्या या मोर्चाची सांगता अलका टॉकिज चौकात झाली. दुपारी शिवसेनेतर्फे एक अनोख आंदोलन करण्यात आलं. अभिनव चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये कारला बैलगाडी प्रमाणे गाढवं जोडण्यात आली होती. वाहन चालवण्यासाठी असाच जनावरांचा वापर करावा लागेल असा संदेश यातुन देण्यात आला. पुण्यामध्ये तर 'बैलगाडीवर बाईक' आंदोलन झालं आणि सांगलीमध्ये तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीनं कार ओढत मोर्चा काढला. पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर बैलगाडीशिवाय पर्याय नाही असे फलकसुध्दा यावेळी शिवसैनिकांनी लावले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 11:01 AM IST

पेट्रोल दरवाढीचा राज्यभरात निषेध

15 मे

पेट्रोलच्या दरवाढीच्या विरोधात पुण्यामध्ये आज भाजप आणि शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केली. पुण्यातील कसबा पेठेमधून सकाळी भाजप तर्फे बैलगाडीवरुन बाईक्सचा मोर्चा काढण्यात आला.

पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर एक दिवस बैलगाडी वापरायची वेळ सर्व सामान्यांवर येईल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. कसबा गणपती पासून सुरुवात झालेला हा मोर्चा अलका टॉकिज चौकापर्यंत नेण्यात आला. पुण्यातील भाजपचे नगरसेवक विकास मठकरी यांनीही अशाच प्रकारच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं.

डेक्कन बस स्टॉप जवळुन सुरुवात झालेल्या या मोर्चाची सांगता अलका टॉकिज चौकात झाली. दुपारी शिवसेनेतर्फे एक अनोख आंदोलन करण्यात आलं.

अभिनव चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये कारला बैलगाडी प्रमाणे गाढवं जोडण्यात आली होती. वाहन चालवण्यासाठी असाच जनावरांचा वापर करावा लागेल असा संदेश यातुन देण्यात आला.

पुण्यामध्ये तर 'बैलगाडीवर बाईक' आंदोलन झालं आणि सांगलीमध्ये तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीनं कार ओढत मोर्चा काढला. पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर बैलगाडीशिवाय पर्याय नाही असे फलकसुध्दा यावेळी शिवसैनिकांनी लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close