S M L

'ऊस गोड लागला म्हणून.. 50 कोटी थकवले !'

आशिष जाधव, मुंबई16 मेकर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्याला पब्लिक कंपनी होऊ द्यायचं. तसेच स्वतः बरोबरच इतर बँकांचंही कर्ज बुडवण्यासाठी त्यापब्लिक कंपनीला मदत करायची. असेही प्रकार राज्य बँकेच्या संचालक मंडळाकडून झाले आहेत. असंच एक प्रकरण सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या डोंगराई सागरेश्वर सहकारी साखर कारखान्याचं. माजी आमदार आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे सदस्य पृथ्वीराज देशमुख यांच्या या वादग्रस्त साखर कारखान्याने राज्य बँकेचे जवळपास 50 कोटी रुपये थकवले आहेत. सांगली जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांबरोबरच सहकार क्षेत्रातील नेत्यांचासुद्धा मोठा उत्कर्ष झाला. असेच एक स्वयंभू सहकार नेते म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. पतंगराव कदम यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीशी सलगीमुळे देशमुख आज राष्ट्रीय सहकारी विकास निगमसारख्या सहकारातल्या मोठ्या महामंडळावर राज्याचे एकमेव प्रतिनिधी आहेत. पण देशमुख सहकाराचे मूळ तत्वच विसरले. आणि त्यांनी कर्ज बुडवण्यासाठी चक्क आपल्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याची पब्लिक कंपनी बनवली. पृथ्वीराज देशमुख यांनी राज्य बँकेच्या मदतीने कडेगाव इथल्या डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याचे केन ऍग्रो एनर्जी लिमिटेड या पब्लिक कंपनीमध्ये रुपांतर केलं. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. 1998 पासून राज्य बँकेचा कर्जपुरवठा डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याला होत होता. पण एकीकडे कारखाना तोट्यात गेला आणि दुसरीकडे कर्जाचे प्रमाण वाढले. त्यामुळे कारखान्याला उभारी आणण्यासाठी पृथ्वीराज देशमुखांनी 2006 मध्ये डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याची केन ऍग्रो एनर्जी लिमिटेड ही पब्लिक कंपनी केली. पण त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही.सहकारी साखर कारखान्याची पब्लिक कंपनी केल्यामुळे तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी डोंगराई सागरेश्वर कारखान्याच्या कर्जाची थकहमी रद्द केली. पण राज्य बँकेने मात्र कारखान्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी कुठलीही पावले उचलली नाहीत. खर तर पृथ्वीराज देशमुखांनी आपल्या साखर कारखान्यासाठी राज्य बँकेच्या मदतीने इतरही अनेक बँकांचे कर्ज घेतले आहे. लीड बँक म्हणून राज्य बँकेबरोबरच मुंबई जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक, ठाणे जिल्हा बँक, अभ्युदय बँक, कराड जनता बँक, शामराव विठ्ठलराव बँक आणि सेंट्रल बँक अशा एकूण 8 बँकांकडून कर्ज घेण्यात आलं. ते बुडवण्यातही आलं. त्यामुळे सेंट्रल बँकेने इतर बँकांच्या मदतीने पृथ्वीराज देशमुखांच्या कारखान्याच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली. पण सर्व काही कायदेशीर आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य आहे असं आता पृथ्वीराज देशमुख म्हणत आहे.सहकाराचा स्वाहाकार करण्यात आला त्यात पृथ्वीराज देशमुख यांच्या कारखान्यामुळे राज्य बँकेला 49 कोटी 90 लाख रुपयांचा तोटा झाला. पण राज्य बँकेने मात्र कुठलीही कारवाई केलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 12:32 PM IST

'ऊस गोड लागला म्हणून.. 50 कोटी थकवले !'

आशिष जाधव, मुंबई

16 मे

कर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्याला पब्लिक कंपनी होऊ द्यायचं. तसेच स्वतः बरोबरच इतर बँकांचंही कर्ज बुडवण्यासाठी त्यापब्लिक कंपनीला मदत करायची. असेही प्रकार राज्य बँकेच्या संचालक मंडळाकडून झाले आहेत. असंच एक प्रकरण सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या डोंगराई सागरेश्वर सहकारी साखर कारखान्याचं. माजी आमदार आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे सदस्य पृथ्वीराज देशमुख यांच्या या वादग्रस्त साखर कारखान्याने राज्य बँकेचे जवळपास 50 कोटी रुपये थकवले आहेत.

सांगली जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांबरोबरच सहकार क्षेत्रातील नेत्यांचासुद्धा मोठा उत्कर्ष झाला. असेच एक स्वयंभू सहकार नेते म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. पतंगराव कदम यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे.

राष्ट्रवादीशी सलगीमुळे देशमुख आज राष्ट्रीय सहकारी विकास निगमसारख्या सहकारातल्या मोठ्या महामंडळावर राज्याचे एकमेव प्रतिनिधी आहेत. पण देशमुख सहकाराचे मूळ तत्वच विसरले. आणि त्यांनी कर्ज बुडवण्यासाठी चक्क आपल्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याची पब्लिक कंपनी बनवली.

पृथ्वीराज देशमुख यांनी राज्य बँकेच्या मदतीने कडेगाव इथल्या डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याचे केन ऍग्रो एनर्जी लिमिटेड या पब्लिक कंपनीमध्ये रुपांतर केलं. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे.

1998 पासून राज्य बँकेचा कर्जपुरवठा डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याला होत होता. पण एकीकडे कारखाना तोट्यात गेला आणि दुसरीकडे कर्जाचे प्रमाण वाढले.

त्यामुळे कारखान्याला उभारी आणण्यासाठी पृथ्वीराज देशमुखांनी 2006 मध्ये डोंगराई सागरेश्वर सहकारी कारखान्याची केन ऍग्रो एनर्जी लिमिटेड ही पब्लिक कंपनी केली. पण त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही.

सहकारी साखर कारखान्याची पब्लिक कंपनी केल्यामुळे तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी डोंगराई सागरेश्वर कारखान्याच्या कर्जाची थकहमी रद्द केली. पण राज्य बँकेने मात्र कारखान्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी कुठलीही पावले उचलली नाहीत.

खर तर पृथ्वीराज देशमुखांनी आपल्या साखर कारखान्यासाठी राज्य बँकेच्या मदतीने इतरही अनेक बँकांचे कर्ज घेतले आहे. लीड बँक म्हणून राज्य बँकेबरोबरच मुंबई जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक, ठाणे जिल्हा बँक, अभ्युदय बँक, कराड जनता बँक, शामराव विठ्ठलराव बँक आणि सेंट्रल बँक अशा एकूण 8 बँकांकडून कर्ज घेण्यात आलं. ते बुडवण्यातही आलं.

त्यामुळे सेंट्रल बँकेने इतर बँकांच्या मदतीने पृथ्वीराज देशमुखांच्या कारखान्याच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली. पण सर्व काही कायदेशीर आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य आहे असं आता पृथ्वीराज देशमुख म्हणत आहे.

सहकाराचा स्वाहाकार करण्यात आला त्यात पृथ्वीराज देशमुख यांच्या कारखान्यामुळे राज्य बँकेला 49 कोटी 90 लाख रुपयांचा तोटा झाला. पण राज्य बँकेने मात्र कुठलीही कारवाई केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close