S M L

मोस्ट वॉन्टेड आरोपी ठाण्यात !

17 मेभारत सरकारने नुकतीच पाकमध्ये लपून बसलेल्या 50 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाक सरकारकडे सोपवली होती. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहत असलेल्या एका आरोपीचा समावेश या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. वजहुल कमर खान असं या आरोपीचं नाव आहे. 2003 मध्ये मुलुंडमध्ये झालेल्या लोकल बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण सध्या तो जामीनावर बाहेर आला आहे. 10 मे 2010 ला एटीएस ने वजहुल खानला अटक केली होती. बॉम्बस्फोटानंतर तो मुंबई सोडून उत्तरप्रदेशमध्ये पळून गेला होता. 2003 -2004 मध्ये एटीएस ने खानच्या अटकेची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि गृहमंत्रालयाला दिली होती. तरीही त्याचं नाव वॉन्टेड लिस्टमध्ये कसं आलं ? याचा तपास केंद्र सरकारने सुरू केला आहे. हाफिज मोहम्मद सईद, जकी उर रहमान लखवी सैय्यद सलाउद्दीन, आणि दाऊद इब्राहीम सारख्या गुन्हेगारांचा या यादीत समावेश होता. वजहुल कमर खानचाही या यादित समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पाकला सोपवलेल्या मोस्ट वॉन्टेड यादीतील झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ठाण्यातच असताना त्याच्या नावाचा समावेश या यादीत झाला कसा ? वजहूल खानचा समावेश करण्यासाठी कोण अधिकारी जबाबदार आहे याची चौकशी होणार आहे. 41 क्रमाकांवर वजहूल खानचा समावेश आहे. मार्च महिन्यात गृह सचिवाच्या बैठकीत ही यादी पाककडे सोपवण्यात आली होती. या यादीत हाफीज सईद आणि झाकीर रहेमान लाखवी सारख्याचा समावेश आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 04:22 PM IST

मोस्ट वॉन्टेड आरोपी ठाण्यात !

17 मे

भारत सरकारने नुकतीच पाकमध्ये लपून बसलेल्या 50 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाक सरकारकडे सोपवली होती. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहत असलेल्या एका आरोपीचा समावेश या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे.

वजहुल कमर खान असं या आरोपीचं नाव आहे. 2003 मध्ये मुलुंडमध्ये झालेल्या लोकल बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण सध्या तो जामीनावर बाहेर आला आहे.

10 मे 2010 ला एटीएस ने वजहुल खानला अटक केली होती. बॉम्बस्फोटानंतर तो मुंबई सोडून उत्तरप्रदेशमध्ये पळून गेला होता. 2003 -2004 मध्ये एटीएस ने खानच्या अटकेची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि गृहमंत्रालयाला दिली होती.

तरीही त्याचं नाव वॉन्टेड लिस्टमध्ये कसं आलं ? याचा तपास केंद्र सरकारने सुरू केला आहे. हाफिज मोहम्मद सईद, जकी उर रहमान लखवी सैय्यद सलाउद्दीन, आणि दाऊद इब्राहीम सारख्या गुन्हेगारांचा या यादीत समावेश होता. वजहुल कमर खानचाही या यादित समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान पाकला सोपवलेल्या मोस्ट वॉन्टेड यादीतील झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ठाण्यातच असताना त्याच्या नावाचा समावेश या यादीत झाला कसा ? वजहूल खानचा समावेश करण्यासाठी कोण अधिकारी जबाबदार आहे याची चौकशी होणार आहे.

41 क्रमाकांवर वजहूल खानचा समावेश आहे. मार्च महिन्यात गृह सचिवाच्या बैठकीत ही यादी पाककडे सोपवण्यात आली होती. या यादीत हाफीज सईद आणि झाकीर रहेमान लाखवी सारख्याचा समावेश आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close