S M L

विरोधीकांच्या बैठकीला न जाण्याचा अधिकार्‍यांना आदेश

19 मेविरोधी पक्षनेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत न जाण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या सहीने या संदर्भात एक परिपत्रकच काढण्यात आलंय. ''आम्ही बोलावलेल्या बैठकीत अधिकारी येत नाही'' असा आरोप नेहमीच विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभा आणि परिषदेत केला. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या बैठकीत जावे की नाही अशी विचारणा अधिकार्‍यांकडून होते. त्यासाठीच आता हे परिपत्रक जारी करण्यात आलंय. प्रशासकीय कामावर देखरेख करण्याचे, संबधीत अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्याचे तसेच सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार मंत्र्यांना आहेत. पण विधानसभा आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांना नाहीत असं या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस अधिकार्‍यांनी उपस्थित राहू नये. शिवाय जिल्हा दौर्‍यातही सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळावे अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या. हे परिपत्रक जारी करुन सरकारने विरोधी पक्षांचे अधिकार कमी केल्याची भावना विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 10:03 AM IST

विरोधीकांच्या बैठकीला न जाण्याचा अधिकार्‍यांना आदेश

19 मे

विरोधी पक्षनेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत न जाण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या सहीने या संदर्भात एक परिपत्रकच काढण्यात आलंय. ''आम्ही बोलावलेल्या बैठकीत अधिकारी येत नाही'' असा आरोप नेहमीच विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभा आणि परिषदेत केला.

त्यामुळेच विरोधी पक्षांच्या बैठकीत जावे की नाही अशी विचारणा अधिकार्‍यांकडून होते. त्यासाठीच आता हे परिपत्रक जारी करण्यात आलंय. प्रशासकीय कामावर देखरेख करण्याचे, संबधीत अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्याचे तसेच सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार मंत्र्यांना आहेत.

पण विधानसभा आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांना नाहीत असं या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस अधिकार्‍यांनी उपस्थित राहू नये.

शिवाय जिल्हा दौर्‍यातही सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळावे अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या. हे परिपत्रक जारी करुन सरकारने विरोधी पक्षांचे अधिकार कमी केल्याची भावना विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close