S M L

साहित्य संमेलनाच्या शिल्लक 82 लाख साहित्यावरच खर्च होणार !

19 मेपुणे साहित्य संमेलनातील शिल्लक राहिलेल्या 82 लाख रूपयांचे काय करायचे हा प्रश्न आता सुटला आहे. नव्याने निवडून आलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 82 लाखाच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी काही उपक्रम राबवायचे ठरवले आहे. यावर्षी जमा होणार्‍या साडेपाच ते 6 लाख रूपयांच्या व्याजातून पुण्यात समीक्षकांचे साहित्य संमेलन तसेच युवा साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे .याचसोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी स्वत: चा दिवाळी अंक काढला जाणार आहेत. याशिवाय परिषदेतर्फे संशोधनात्मक ग्रंथनिर्मिती केली जाणार असून साहित्य परिषदेशी संबंधित दिग्गज व्यक्तींच्या योगदानावर आधारित माहितीपटाची निर्मितीही केली जाणार आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मसापच्या कार्याध्यक्ष, सहकार्यवाह, कोषाध्यक्षांनी ही माहिती दिली. पुण्यातील साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या पुण्यभूषण फाऊंडेशनकडे जमा असलेल्या 82 लोकांचा विनियोग कसा करायचा असा वाद निर्माण झाला होता. मागील दोन संमेलनाद्यक्ष द. भी. कांबळे आणि उत्तम कांबळे यांना संपूर्ण महाराष्ट्रात साहित्यिक गाठीभेटींकरता प्रत्येकी 1 लाख रूपये दिले होते. तसे यापुढच्या संमेलनाध्यक्षांना द्यायचे का याचा मात्र निर्णय अद्याप झालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 02:38 PM IST

साहित्य संमेलनाच्या शिल्लक 82 लाख साहित्यावरच खर्च होणार !

19 मे

पुणे साहित्य संमेलनातील शिल्लक राहिलेल्या 82 लाख रूपयांचे काय करायचे हा प्रश्न आता सुटला आहे. नव्याने निवडून आलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 82 लाखाच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी काही उपक्रम राबवायचे ठरवले आहे.

यावर्षी जमा होणार्‍या साडेपाच ते 6 लाख रूपयांच्या व्याजातून पुण्यात समीक्षकांचे साहित्य संमेलन तसेच युवा साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे .याचसोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी स्वत: चा दिवाळी अंक काढला जाणार आहेत.

याशिवाय परिषदेतर्फे संशोधनात्मक ग्रंथनिर्मिती केली जाणार असून साहित्य परिषदेशी संबंधित दिग्गज व्यक्तींच्या योगदानावर आधारित माहितीपटाची निर्मितीही केली जाणार आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मसापच्या कार्याध्यक्ष, सहकार्यवाह, कोषाध्यक्षांनी ही माहिती दिली. पुण्यातील साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या पुण्यभूषण फाऊंडेशनकडे जमा असलेल्या 82 लोकांचा विनियोग कसा करायचा असा वाद निर्माण झाला होता.

मागील दोन संमेलनाद्यक्ष द. भी. कांबळे आणि उत्तम कांबळे यांना संपूर्ण महाराष्ट्रात साहित्यिक गाठीभेटींकरता प्रत्येकी 1 लाख रूपये दिले होते. तसे यापुढच्या संमेलनाध्यक्षांना द्यायचे का याचा मात्र निर्णय अद्याप झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close