S M L

आणखी एक 'मोस्ट वॉन्टेड' मुंबईत !

19 मेमोस्ट वॉन्डेट यादीत अजून एक घोळ समोर आला आहे. फिरोज अब्दुल रशिद खान नावाचा आणखी एक आरोपी भारतात आहे. आणि तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहे. फिरोज खान हा 93 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधला आरोपी आहे. कट रचणे, कटात सामील होणे, देशविरोधी कृत्य असे फिरोज खानवर आरोप आहे. फिरोज ऊर्फ हमजा याला 5 फेब्रुवारी 2010 ला मुंबई क्राईम ब्रांचने अटक करून सीबीआयकडे सोपवलं होतं. 51 वर्षीय फिरोज खानने मुंबईतून पळून गेल्यावर दुबई, नेपाळ असा खोट्या पासपोर्टचा वापर करण्याचा आरोप ही आहे.दरम्यान मोस्ट वॉन्टेड यादी दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे राहणार्‍या वजहूल कमर खान या आरोपीच नाव ही यादीत आलं होतं.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. यादी बनवताना चूक झाली अशी कबुली त्यांनी दिली. ठाण्यातला आरोपी वजहूल कमर खान याला मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी 2010 मध्येच अटक झाली होती. पण 50 अतिरेक्यांची यादी बनवताना मुंबई पोलिसांकडून चुकून त्याचंही नाव आलं. तसेच गुप्तचर विभागाकडूनही चूक झाली असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सीबीआयने आपली वेबसाईट अपडेट केली. आणि 50 जणांच्या यादीतून वजहूल कमर खान याचं नाव काढून टाकलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 04:04 PM IST

आणखी एक 'मोस्ट वॉन्टेड' मुंबईत !

19 मे

मोस्ट वॉन्डेट यादीत अजून एक घोळ समोर आला आहे. फिरोज अब्दुल रशिद खान नावाचा आणखी एक आरोपी भारतात आहे. आणि तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहे.

फिरोज खान हा 93 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधला आरोपी आहे. कट रचणे, कटात सामील होणे, देशविरोधी कृत्य असे फिरोज खानवर आरोप आहे.

फिरोज ऊर्फ हमजा याला 5 फेब्रुवारी 2010 ला मुंबई क्राईम ब्रांचने अटक करून सीबीआयकडे सोपवलं होतं. 51 वर्षीय फिरोज खानने मुंबईतून पळून गेल्यावर दुबई, नेपाळ असा खोट्या पासपोर्टचा वापर करण्याचा आरोप ही आहे.

दरम्यान मोस्ट वॉन्टेड यादी दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे राहणार्‍या वजहूल कमर खान या आरोपीच नाव ही यादीत आलं होतं.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. यादी बनवताना चूक झाली अशी कबुली त्यांनी दिली.

ठाण्यातला आरोपी वजहूल कमर खान याला मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी 2010 मध्येच अटक झाली होती. पण 50 अतिरेक्यांची यादी बनवताना मुंबई पोलिसांकडून चुकून त्याचंही नाव आलं.

तसेच गुप्तचर विभागाकडूनही चूक झाली असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सीबीआयने आपली वेबसाईट अपडेट केली. आणि 50 जणांच्या यादीतून वजहूल कमर खान याचं नाव काढून टाकलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close