S M L

शेतकर्‍यांवर पोलिसांचा अत्याचार लज्जास्पद - सोनिया गांधी

19 मेउत्तरप्रदेशात मुख्यमंत्री मायावती विरुद्ध काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहचला आहे. वाराणसीत झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मायावती सरकरावर हल्लाबोल केला. नोएडातल्या भट्टा-पारसौल गावात झालेल्या हिंसाचारावरून सोनियांनी त्यांना धारेवर धरलं. भूसंपादन विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेला अत्याचार लज्जास्पद असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. उत्तर प्रदेशात प्रशासनाचे अस्तित्वच नाहीसं झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सोनियांनी मायावतींना फटकारले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 01:47 PM IST

शेतकर्‍यांवर पोलिसांचा अत्याचार लज्जास्पद - सोनिया गांधी

19 मे

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री मायावती विरुद्ध काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहचला आहे. वाराणसीत झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मायावती सरकरावर हल्लाबोल केला.

नोएडातल्या भट्टा-पारसौल गावात झालेल्या हिंसाचारावरून सोनियांनी त्यांना धारेवर धरलं. भूसंपादन विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेला अत्याचार लज्जास्पद असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. उत्तर प्रदेशात प्रशासनाचे अस्तित्वच नाहीसं झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सोनियांनी मायावतींना फटकारले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close