S M L

'आदर्श'मध्ये सुनील तटकरे यांचेही नाव

23 मेवादग्रस्त आदर्श सोसायटीच्या न्यायलयीन आयोगाच्या सुनावणी दरम्यान नवे खुलासे होत आहे. जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचंही नाव आदर्शशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे न्यायालयीन आयोगाने तटकरे यांनासुद्धा समन्स बजावला. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबरच तटकरे यांनीही आता 26 मेपर्यंत आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे.आदर्श घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबरच आता जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावरही आदर्शला लाभ पोहोचवल्याचा आरोप झाला आहे. विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री असताना सुनील तटकरे यांनी बेस्टच्या बॅक बे डेपोच्या ऍप्रोच रोडवरचे आरक्षण हटवून ती जागा आदर्श सोसायटीला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदर्शला जास्त एफएसआयदेखील मिळाला. या बदल्यात आदर्श सोसायटी बेस्टला भूखंडाची किंमत म्हणून नुकसान भरपाई करेल असा शेरा लिहून तटकरे यांनी फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवली. अशी माहिती कागदपत्रावरून उघड झाली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्याबरोबर सुनिल तटकरे यांनाही आयोगाने समन्स बजावले आहेत. आदर्शच्या जमिनीचा वाद चांगलाच पेटला आहे. भारतीय लष्कराने आदर्शच्या जमिनीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यासाठी लष्कराचे ब्रिगेडियर दिपक सक्सेना यांनी प्रतिज्ञापत्राबरोबर 1889 चा बॉम्बे आर्काईव्हचा नकाशा आणि 1924 चा सर्व्हे ऑफ इंडियाचा नकाशा पुराव्याच्या रुपात सादर केले. तर राज्य सरकारनेदेखील आदर्शचा भुखंड महसूल खात्याचाच असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी बृह्नमुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांनी महसुली दस्तावेज सादर केले आहेत. जवळपास 140 साक्षीदारांची साक्ष आयोगाला घ्यायची आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रालयातल्या कारकुनापर्यंत आणि आदर्शच्या प्रमोटरपासून ते माजी लष्करप्रमुखांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे आयोगाची सुनावणी जसजशी पुढे जाईल तसतसे अनेक मोठे खुलासे होणार असं दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 02:50 PM IST

'आदर्श'मध्ये सुनील तटकरे यांचेही नाव

23 मे

वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या न्यायलयीन आयोगाच्या सुनावणी दरम्यान नवे खुलासे होत आहे. जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचंही नाव आदर्शशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे न्यायालयीन आयोगाने तटकरे यांनासुद्धा समन्स बजावला. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबरच तटकरे यांनीही आता 26 मेपर्यंत आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे.

आदर्श घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबरच आता जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावरही आदर्शला लाभ पोहोचवल्याचा आरोप झाला आहे.

विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री असताना सुनील तटकरे यांनी बेस्टच्या बॅक बे डेपोच्या ऍप्रोच रोडवरचे आरक्षण हटवून ती जागा आदर्श सोसायटीला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदर्शला जास्त एफएसआयदेखील मिळाला.

या बदल्यात आदर्श सोसायटी बेस्टला भूखंडाची किंमत म्हणून नुकसान भरपाई करेल असा शेरा लिहून तटकरे यांनी फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवली. अशी माहिती कागदपत्रावरून उघड झाली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्याबरोबर सुनिल तटकरे यांनाही आयोगाने समन्स बजावले आहेत.

आदर्शच्या जमिनीचा वाद चांगलाच पेटला आहे. भारतीय लष्कराने आदर्शच्या जमिनीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यासाठी लष्कराचे ब्रिगेडियर दिपक सक्सेना यांनी प्रतिज्ञापत्राबरोबर 1889 चा बॉम्बे आर्काईव्हचा नकाशा आणि 1924 चा सर्व्हे ऑफ इंडियाचा नकाशा पुराव्याच्या रुपात सादर केले.

तर राज्य सरकारनेदेखील आदर्शचा भुखंड महसूल खात्याचाच असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी बृह्नमुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांनी महसुली दस्तावेज सादर केले आहेत.

जवळपास 140 साक्षीदारांची साक्ष आयोगाला घ्यायची आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रालयातल्या कारकुनापर्यंत आणि आदर्शच्या प्रमोटरपासून ते माजी लष्करप्रमुखांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे आयोगाची सुनावणी जसजशी पुढे जाईल तसतसे अनेक मोठे खुलासे होणार असं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close