S M L

नदीपात्रांवर अतिक्रमण विरोधात नागरिकांनीच थोपटले दंड

अनुपम सराफ, सिटीजन जर्नलिस्ट, पुणे23 मेपुण्याच्या बाणेर - बालेवाडी परिसरातील देव नदीच्या पात्रात आणि किनार्‍यावर काँक्रिटीकरण होतं आहे. यामुळे देवनदीचा नाला होत असून साठ मिटर रूंदीची ही नदी अनेक ठिकाणी जेमतेम एक मीटर एवढीच रूंद राहिली आहे. या विषयावर बाणेर एरिया सभा या नागरिकांच्या संघटनेनं आवाज उठवलाय तसेच जनहित याचिकाही दाखल केली. बाणेर एरिया सभेचे सदस्य आयबीएन लोकमतचे सिटीजन जर्नलिस्ट अनुपम सराफ यांनी देव नदीत होत असलेल्या सरकारी अतिक्रमणाचा घेतलेला हा वेध.नदीपात्रात निर्लज्जपणे केलेली बेकायदेशीर बांधकाम, त्यामुळे अरुंद होत जाणार्‍या नद्या आणि मग पावसाळ्यात पात्र सोडून वस्तीत घुसणार पाणी हे चित्र दरवर्षी पावसाळ्यात सगळीकडचं पाह्याला मिळतं. बाणेर - बालेवाडी परिसरात जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेअंतर्गत होत असलेल्या कामाचा खर्च आहे 68 कोटी रूपये. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात आवाजही उठवला होता. या प्रकरणी न्यायालयानेही दखल घेत काम थांबवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या दणक्यानंतर प्रशासन जागं झालंय. आणि नागरिकांच्या जागरूकतेला दाद देत महापौरानीही काम थांबवण्याचे आश्वासन दिलं आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडवला होता. नद्यांतील अतिक्रमणामुळे आलेल्या पुरांमुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलं होतं. तर काही नागरिकांना आपले प्राण ही गमवावे लागले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 11:33 AM IST

नदीपात्रांवर अतिक्रमण विरोधात नागरिकांनीच थोपटले दंड

अनुपम सराफ, सिटीजन जर्नलिस्ट, पुणे

23 मे

पुण्याच्या बाणेर - बालेवाडी परिसरातील देव नदीच्या पात्रात आणि किनार्‍यावर काँक्रिटीकरण होतं आहे. यामुळे देवनदीचा नाला होत असून साठ मिटर रूंदीची ही नदी अनेक ठिकाणी जेमतेम एक मीटर एवढीच रूंद राहिली आहे.

या विषयावर बाणेर एरिया सभा या नागरिकांच्या संघटनेनं आवाज उठवलाय तसेच जनहित याचिकाही दाखल केली. बाणेर एरिया सभेचे सदस्य आयबीएन लोकमतचे सिटीजन जर्नलिस्ट अनुपम सराफ यांनी देव नदीत होत असलेल्या सरकारी अतिक्रमणाचा घेतलेला हा वेध.

नदीपात्रात निर्लज्जपणे केलेली बेकायदेशीर बांधकाम, त्यामुळे अरुंद होत जाणार्‍या नद्या आणि मग पावसाळ्यात पात्र सोडून वस्तीत घुसणार पाणी हे चित्र दरवर्षी पावसाळ्यात सगळीकडचं पाह्याला मिळतं.

बाणेर - बालेवाडी परिसरात जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेअंतर्गत होत असलेल्या कामाचा खर्च आहे 68 कोटी रूपये. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

परिसरातील नागरिकांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात आवाजही उठवला होता. या प्रकरणी न्यायालयानेही दखल घेत काम थांबवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या दणक्यानंतर प्रशासन जागं झालंय.

आणि नागरिकांच्या जागरूकतेला दाद देत महापौरानीही काम थांबवण्याचे आश्वासन दिलं आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडवला होता. नद्यांतील अतिक्रमणामुळे आलेल्या पुरांमुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलं होतं. तर काही नागरिकांना आपले प्राण ही गमवावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close