S M L

पद्मभूषण डॉ.रजनीकांत आरोळे कालवश

26 मेजेष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचं काल पुण्यात निधन झालं आहे. ते 76 वर्षांचे होते. ह्रद्‌यविकारानं त्यांचं निधन झालं. महाराष्ट्रातील दुर्गम भागात त्यांनी आरोग्यसेवा अतिशय चांगल्या रीतीने राबवण्याचे श्रेय त्यांना जातं. महाराष्ट्रातील 300 दुर्गम गावांत त्यांच्या आरोग्य सेवा योजना कार्यान्वित आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन मॅगसेसे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलंय. डॉक्टर आरोळे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं राहत होते. तेथुनच त्यांनी त्यांच्या आरोग्य समाजसेवेची सुरवात केली. आज दुपारी त्यांच्यावर जामखेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केवळ सेवाच नाही तर गावोगावी निष्णात आरोग्यसेवक तयार करण्याचे मोलाचे कामही डॉ. आरोळेंनी केलं.खेड्यापाड्यातल्या आजारांची मूळ कारणं जंतू नाहीत तर गरिबी आहे हे त्यांनी जाणलं. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची नाही तर लोकशिक्षणाची गरज आहे हे त्यांनी ओळखले. त्यासाठी स्पेशलीस्ट डॉक्टरांची नाही तर गोरगरीब आया-बहिणींची फौज त्यांनी तयार केली. आणि बघताबघता गांव निरोगी झाली. ही कथा आहे जामखेडसारख्या रखरखत्या तालुक्यात आरोग्यसेवेचा वटवृक्ष उभा करणार्‍या डॉक्टर आरोळेंची. महाराष्ट्राच्या मध्यावरचं जामखेड. येथील शेतीसारखंच लोकांचे रखरखीत जगणे. जन्माला येताच दगावणारी मुलं आणि बाळंतपणात मरणार्‍या बायका. 1970 मध्ये डॉक्टर आरोळेंनी हे चक्र थांबवण्याचं ठरवलं. डॉ. रजनीकांत आरोळे म्हणतात, आमची पन्नास टक्के लहान मुलं ज्यांचं मरण्याचं कारण कुपोषण असतं आणि मग इन्फेक्शन येतं. बहुसंख्य लोक अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेमुळे आजारी पडतात. त्यासाठी फार मोठ्या डॉक्टरांची किंवा दवाखान्यांची गरज नाही. त्यासाठी आम्हाला एक सैन्य तयार करायचंय्य खेड्यापाड्यात.गावातल्या वंचित समूहांमधील बायकांपासून त्यांनी सुरुवात केली. रोगजंतूंसोबतच त्यांनी लढा दिला त्यांच्या गरिबीविरोधातही. डॉ. रजनीकांत आरोळे म्हणतात, आमच्या स्त्रियांचा आरोग्याच्या मुळाशी जंतू नाहीत दोन पायांचे जंतू आहेत. सामाजिक रुढी. त्या कशा कमी करता येतील यासाठी डॉक्टर किंवा तज्ञाची गरज नाही. त्यासाठी आरोग्याच्या ज्ञानाचं डिमिस्टीफिकेशन.आरोळेंनी हे डिमिस्टीफिकेशन डीसेंट्रलाईजही केलं. कुठे लेप्रसी पेशंट स्वत:च्या आजारावर मात करून दुसर्‍यांना आरोग्याची सेवा देवू लागली, तर कुठे विधवा, परित्यक्ता गावाला आरोग्यशिक्षणाचे धडे देवू लागली.आरोग्यसेविका जिजाबाई भांगेर म्हणता, कितीतरी पोरं लेकरं हगवण लागून मरायचे गावकुसानी. बाळंतीणी आडून मरायच्या. कुष्ठरोग होवून देवाचे म्हणून शान अधश्रद्धाने पूर्वी लोक मरायचे. हे आम्ही शिक्षण घेतल्यानं त्यांना दिलं. त्याचा आमच्या गावाला फायदा झाला.याचा थेट फायदा पंचक्रोशीतल्या 300 गावांना झाला. त्याशिवाय देशभरातल्या 1 लाख स्त्रियांना डॉक्टरांनी प्रशिक्षण दिलं. आजार वेशीबाहेर पळाले, गावात सुबत्ता आली आणि मृत्यूदर कमी झाले. महाराष्ट्राच्या आजारावर डॉक्टर आरोळेंनी शोधलेला हा रामबाण उपाय पैशावर आधारलेला नाही, तर लोकांच्या सहभागावर उभा राहिलेला. त्यामुळे इथली आजारी गावं आता निरोगी बनली. आज या आरोग्यसेविका बाळबाळंतीणींपासून टीबी, डायबेटिस पेशंट्सना उपचार देतात. कुटुंबांच्या आर्थिक विकासासाठी धडपडतात. उपचाराइतकंच प्रतिबंधासाठी झटतात.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 10:41 AM IST

पद्मभूषण डॉ.रजनीकांत आरोळे कालवश

26 मे

जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचं काल पुण्यात निधन झालं आहे. ते 76 वर्षांचे होते. ह्रद्‌यविकारानं त्यांचं निधन झालं. महाराष्ट्रातील दुर्गम भागात त्यांनी आरोग्यसेवा अतिशय चांगल्या रीतीने राबवण्याचे श्रेय त्यांना जातं.

महाराष्ट्रातील 300 दुर्गम गावांत त्यांच्या आरोग्य सेवा योजना कार्यान्वित आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन मॅगसेसे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलंय. डॉक्टर आरोळे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं राहत होते.

तेथुनच त्यांनी त्यांच्या आरोग्य समाजसेवेची सुरवात केली. आज दुपारी त्यांच्यावर जामखेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केवळ सेवाच नाही तर गावोगावी निष्णात आरोग्यसेवक तयार करण्याचे मोलाचे कामही डॉ. आरोळेंनी केलं.

खेड्यापाड्यातल्या आजारांची मूळ कारणं जंतू नाहीत तर गरिबी आहे हे त्यांनी जाणलं. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची नाही तर लोकशिक्षणाची गरज आहे हे त्यांनी ओळखले.

त्यासाठी स्पेशलीस्ट डॉक्टरांची नाही तर गोरगरीब आया-बहिणींची फौज त्यांनी तयार केली. आणि बघताबघता गांव निरोगी झाली. ही कथा आहे जामखेडसारख्या रखरखत्या तालुक्यात आरोग्यसेवेचा वटवृक्ष उभा करणार्‍या डॉक्टर आरोळेंची.

महाराष्ट्राच्या मध्यावरचं जामखेड. येथील शेतीसारखंच लोकांचे रखरखीत जगणे. जन्माला येताच दगावणारी मुलं आणि बाळंतपणात मरणार्‍या बायका. 1970 मध्ये डॉक्टर आरोळेंनी हे चक्र थांबवण्याचं ठरवलं.

डॉ. रजनीकांत आरोळे म्हणतात, आमची पन्नास टक्के लहान मुलं ज्यांचं मरण्याचं कारण कुपोषण असतं आणि मग इन्फेक्शन येतं. बहुसंख्य लोक अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेमुळे आजारी पडतात. त्यासाठी फार मोठ्या डॉक्टरांची किंवा दवाखान्यांची गरज नाही. त्यासाठी आम्हाला एक सैन्य तयार करायचंय्य खेड्यापाड्यात.

गावातल्या वंचित समूहांमधील बायकांपासून त्यांनी सुरुवात केली. रोगजंतूंसोबतच त्यांनी लढा दिला त्यांच्या गरिबीविरोधातही. डॉ. रजनीकांत आरोळे म्हणतात, आमच्या स्त्रियांचा आरोग्याच्या मुळाशी जंतू नाहीत दोन पायांचे जंतू आहेत. सामाजिक रुढी. त्या कशा कमी करता येतील यासाठी डॉक्टर किंवा तज्ञाची गरज नाही. त्यासाठी आरोग्याच्या ज्ञानाचं डिमिस्टीफिकेशन.

आरोळेंनी हे डिमिस्टीफिकेशन डीसेंट्रलाईजही केलं. कुठे लेप्रसी पेशंट स्वत:च्या आजारावर मात करून दुसर्‍यांना आरोग्याची सेवा देवू लागली, तर कुठे विधवा, परित्यक्ता गावाला आरोग्यशिक्षणाचे धडे देवू लागली.

आरोग्यसेविका जिजाबाई भांगेर म्हणता, कितीतरी पोरं लेकरं हगवण लागून मरायचे गावकुसानी. बाळंतीणी आडून मरायच्या. कुष्ठरोग होवून देवाचे म्हणून शान अधश्रद्धाने पूर्वी लोक मरायचे. हे आम्ही शिक्षण घेतल्यानं त्यांना दिलं. त्याचा आमच्या गावाला फायदा झाला.याचा थेट फायदा पंचक्रोशीतल्या 300 गावांना झाला. त्याशिवाय देशभरातल्या 1 लाख स्त्रियांना डॉक्टरांनी प्रशिक्षण दिलं. आजार वेशीबाहेर पळाले, गावात सुबत्ता आली आणि मृत्यूदर कमी झाले.

महाराष्ट्राच्या आजारावर डॉक्टर आरोळेंनी शोधलेला हा रामबाण उपाय पैशावर आधारलेला नाही, तर लोकांच्या सहभागावर उभा राहिलेला. त्यामुळे इथली आजारी गावं आता निरोगी बनली. आज या आरोग्यसेविका बाळबाळंतीणींपासून टीबी, डायबेटिस पेशंट्सना उपचार देतात. कुटुंबांच्या आर्थिक विकासासाठी धडपडतात. उपचाराइतकंच प्रतिबंधासाठी झटतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close