S M L

शाळेच्या आड महापौरांचा बिझनेस बंद

26 मेकुंपणच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय महापौर श्रध्दा जाधव यांच्या बाबतीत आला. नियमांचे उल्लंघन झालं म्हणून इतरांचे कान टोचणार्‍या महापौरांनी स्वत: महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते मात्र शेवटी महापालिकेनं कायदेशीर कारवाई करून महापौरांना चपराक लगावली आहे. शिवडीच्या महापालिकेच्या शाळेत त्यांच्या मनोहर डेकोरेटर कंपनीचे सामान ठेवलं होतं. ही बातमी आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर महापालिकेने या वृत्ताची दखल घेतली. आणि हे सामान जप्त केलं. त्याचबरोबर महापालिका शाळेचा ताबा महापौरांकडून काढुन घेतला आहे.शिवडी परिसरातील श्रध्दा जाधव यांच्या सासर्‍याच्या नावाने शैक्षणिक शाळा ट्रस्ट म्हणून देण्यात आली. आणि याच शाळेतविद्यार्थ्यांच्या एबीसीडी ऐवजी आवाज येत होता टेबल आणि खुर्च्यांचा. महापौरांचे पती श्रीधर जाधव यांनी मनोहर डेकोरेटर कंपनीचे सामान या शाळेत ठेवले होते. सामान आत आहेत हे समजू नये म्हणून या शाळेला बाहेरुन कुलूप ही लावण्यात आलं होतं. याबद्दल महापौरांनी विचारले असता शाळा बंद असून तिच्या दुरूस्तीसाठी हे पत्रे आणि सामान आणल्याचा दावा महापौरांनी केला होता. तर ही बेकायदेशीर बाब शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली असता. त्यावर सत्तेचा गैरवापर होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.अखेर महापालिकेनं कारवाईचा पवित्रा घेत महापौरांच्या पतीराज्यांचा बिझनेस बंद पाडला. आणि शाळेला विद्यार्थ्यांसाठी मोकळी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 02:25 PM IST

शाळेच्या आड महापौरांचा बिझनेस बंद

26 मे

कुंपणच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय महापौर श्रध्दा जाधव यांच्या बाबतीत आला. नियमांचे उल्लंघन झालं म्हणून इतरांचे कान टोचणार्‍या महापौरांनी स्वत: महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते मात्र शेवटी महापालिकेनं कायदेशीर कारवाई करून महापौरांना चपराक लगावली आहे.

शिवडीच्या महापालिकेच्या शाळेत त्यांच्या मनोहर डेकोरेटर कंपनीचे सामान ठेवलं होतं. ही बातमी आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर महापालिकेने या वृत्ताची दखल घेतली. आणि हे सामान जप्त केलं. त्याचबरोबर महापालिका शाळेचा ताबा महापौरांकडून काढुन घेतला आहे.

शिवडी परिसरातील श्रध्दा जाधव यांच्या सासर्‍याच्या नावाने शैक्षणिक शाळा ट्रस्ट म्हणून देण्यात आली. आणि याच शाळेतविद्यार्थ्यांच्या एबीसीडी ऐवजी आवाज येत होता टेबल आणि खुर्च्यांचा. महापौरांचे पती श्रीधर जाधव यांनी मनोहर डेकोरेटर कंपनीचे सामान या शाळेत ठेवले होते.

सामान आत आहेत हे समजू नये म्हणून या शाळेला बाहेरुन कुलूप ही लावण्यात आलं होतं. याबद्दल महापौरांनी विचारले असता शाळा बंद असून तिच्या दुरूस्तीसाठी हे पत्रे आणि सामान आणल्याचा दावा महापौरांनी केला होता.

तर ही बेकायदेशीर बाब शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली असता. त्यावर सत्तेचा गैरवापर होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

अखेर महापालिकेनं कारवाईचा पवित्रा घेत महापौरांच्या पतीराज्यांचा बिझनेस बंद पाडला. आणि शाळेला विद्यार्थ्यांसाठी मोकळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close