S M L

सोनवणे जळीतकांड प्रकरणात तपास यंत्रणा अपयशी !

30 मेदीप्ती राऊत, नाशिक अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडाला 4 महिने झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या प्रकरणातून राज्यातली तेल माफियांची बजबजपुरी उघड झाली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या वल्गना राज्य सरकारने केल्या. प्रत्यक्षात मात्र तपास करण्याऐवजी तपास टाळण्याचंच काम पोलिसांनी केल्याचं आरोपींना मिळालेल्या जामीनातून सिद्ध झालं आहे. 25 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडानं काळवंडून गेली. त्याचवेळी गरिबांच्या केरोसीनवर माजलेले तेलमाफिया आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणारी सरकारी यंत्रणा यांचं उग्र रुप बाहेर आलं. जनमताच्या रेट्यानं कठोर कारवाई करणं सरकारला भाग पडलं.8 फेब्रुवारीला आरोपींवर मोक्का लावला. तर 8 एप्रिलला हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणातून तेलभेसळीचं मोठं रॅकेट उघड करत असल्याचा आव गृहमंत्र्यांनी आणला. मोठं रॅकेट तर दूरच प्रत्यक्षात अटकेत असलेल्या आरोपींनाही सरकार ताब्यात ठेवू शकलं नाही.- पोपट शिंदेचा मुलगा कुणाल याला 22 फेब्रुवारीलाच जामीन मिळाला.- दुसरा मुलगा विकास आणि जावई दीपक यांना 2 एप्रिलला जामीन मिळाला तर- उरलेल्या 7 आरोपींची 25 मे ला जामिनावर मुक्तता झाली. खरं तर गुन्ह्याच्या दुसर्‍याच दिवशी सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. मुद्देमाल घटनास्थळीच जप्त करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांना 72 दिवस मिळाले आणि पुढे सीबीआयला 47 दिवस...! 120 दिवस उलटले तरी चार्जशीट दाखल झालेली नाही. यातून पोलिसांचा नाकर्तेपणा आणि मोक्काच्या दिखाऊ घोषणेमागचं फाजील राजकारण हेच पुढं आलंय. तेल माफियांना रोखण्यासाठी खरं तर सखोल आणि कठोर कारवाईची संधी या निमित्ताने सरकारला होती. पण तपासात दिरंगाई करून गृहखातं स्वत:च संशयाच्या भोवर्‍यात सापडलंय.राज्य पोलिसांसाठी सवाल1. सर्व आरोपी दुसर्‍याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात होते. मुद्देमाल घटनास्थळीच जप्त करण्यात आला होता. मग, 72 दिवसांच्या तपासानंतर पोलीस काहीच पुरावे का देवू शकले नाहीत ?2. भाजल्यानंतर 6 दिवस जिवंत असलेला यातला मुख्य आरोपी पोपट शिंदे याची मृत्यूपूर्व जबानी पोलिसांनी का टाळली ?3. घटनेपूर्वी यशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांच्यात मोबाईलवरून झालेल्या संभाषणाचा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये का केला नाही ?4. चार महिने उलटल्यावरही या संभाषणाचा तपशील पोलिसांनी कोर्टापुढे का आणला नाही ?5. पोपट शिंदेच्या घरातील समारंभांमध्ये यशवंत सोनवणे आणि इतर पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचे फोटो आणि सीडीज कुठे गेल्या?सीबीआयसाठी सवाल1. सीबीआयकडे तपास सुपूर्त झाल्यानंतर सर्व आरोपींचे जबाब त्यांना जेलमध्येच घेण्याची परवानगी मिळाली होती. पुरावे स्थानिक पोलिसांकडून मिळाले होते. तरी त्यानंतर 47 दिवसात सीबीआयचा तपास पुढे का गेला नाही ?2. बीपीसीएल कंपनीकडून गोळा केलेल्या कागदपत्रांमधून काय पुढे आले ?3. मोबाईल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीतून काय सिद्ध झाले ?4. फोरेन्सीक एक्झॅमिनेशनसाठी दिल्लीला पाठवलेल्या सोनवणेंच्या फोनचा रिपोर्ट अजून का आला नाही? 5. मोक्का लावलेले सर्व आरोपी एकाच सिंडीकेटचे मेंबर असल्याचे पुरावे सीबीआय अद्यापपर्यंत का देऊ शकली नाही?महसूल आणि पोलीस यंत्रणेचे लागेबांधे !यशवंत सोनवणे जळीतकांडानंतर तेल भेसळीसोबत आणखी एक गंभीर वास्तव पुढे आलं. ते म्हणजे राज्यातील तेल माफियांसोबत महसूल आणि पोलीस यंत्रणेचे असलेले लागेबांधे. त्यानंतर 24 तासात पोलिसांनी घातलेल्या धाडींच्या देखाव्यामुळे सामान्यांच्या संताप तीव्र झाला होती. तेलभेसळीचं समूळ उच्चाटण करण्यासाठी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत होती. शेवटी 8 फेब्रुवारीला गृहखात्याने या प्रकरणातल्या आरोपींविरोधात मोक्काची कारवाई केली. त्यात निलंबित पोलीस अधिकारी जगन पिंपळे, मदन गटालिया आणि धीरज येवले यांनाही हा मोक्का लावण्यात आला. मात्र 80 दिवसात यातल्या एकाही आरोपीला पोलीस ताब्यात घेवू शकले नाहीत. उलट 15 जूनपर्यंत यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 12:14 PM IST

सोनवणे जळीतकांड प्रकरणात तपास यंत्रणा अपयशी !

30 मे

दीप्ती राऊत, नाशिक अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडाला 4 महिने झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या प्रकरणातून राज्यातली तेल माफियांची बजबजपुरी उघड झाली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या वल्गना राज्य सरकारने केल्या. प्रत्यक्षात मात्र तपास करण्याऐवजी तपास टाळण्याचंच काम पोलिसांनी केल्याचं आरोपींना मिळालेल्या जामीनातून सिद्ध झालं आहे.

25 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडानं काळवंडून गेली. त्याचवेळी गरिबांच्या केरोसीनवर माजलेले तेलमाफिया आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणारी सरकारी यंत्रणा यांचं उग्र रुप बाहेर आलं. जनमताच्या रेट्यानं कठोर कारवाई करणं सरकारला भाग पडलं.

8 फेब्रुवारीला आरोपींवर मोक्का लावला. तर 8 एप्रिलला हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणातून तेलभेसळीचं मोठं रॅकेट उघड करत असल्याचा आव गृहमंत्र्यांनी आणला. मोठं रॅकेट तर दूरच प्रत्यक्षात अटकेत असलेल्या आरोपींनाही सरकार ताब्यात ठेवू शकलं नाही.

- पोपट शिंदेचा मुलगा कुणाल याला 22 फेब्रुवारीलाच जामीन मिळाला.- दुसरा मुलगा विकास आणि जावई दीपक यांना 2 एप्रिलला जामीन मिळाला तर- उरलेल्या 7 आरोपींची 25 मे ला जामिनावर मुक्तता झाली.

खरं तर गुन्ह्याच्या दुसर्‍याच दिवशी सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. मुद्देमाल घटनास्थळीच जप्त करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांना 72 दिवस मिळाले आणि पुढे सीबीआयला 47 दिवस...! 120 दिवस उलटले तरी चार्जशीट दाखल झालेली नाही. यातून पोलिसांचा नाकर्तेपणा आणि मोक्काच्या दिखाऊ घोषणेमागचं फाजील राजकारण हेच पुढं आलंय.

तेल माफियांना रोखण्यासाठी खरं तर सखोल आणि कठोर कारवाईची संधी या निमित्ताने सरकारला होती. पण तपासात दिरंगाई करून गृहखातं स्वत:च संशयाच्या भोवर्‍यात सापडलंय.

राज्य पोलिसांसाठी सवाल

1. सर्व आरोपी दुसर्‍याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात होते. मुद्देमाल घटनास्थळीच जप्त करण्यात आला होता. मग, 72 दिवसांच्या तपासानंतर पोलीस काहीच पुरावे का देवू शकले नाहीत ?2. भाजल्यानंतर 6 दिवस जिवंत असलेला यातला मुख्य आरोपी पोपट शिंदे याची मृत्यूपूर्व जबानी पोलिसांनी का टाळली ?3. घटनेपूर्वी यशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांच्यात मोबाईलवरून झालेल्या संभाषणाचा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये का केला नाही ?4. चार महिने उलटल्यावरही या संभाषणाचा तपशील पोलिसांनी कोर्टापुढे का आणला नाही ?5. पोपट शिंदेच्या घरातील समारंभांमध्ये यशवंत सोनवणे आणि इतर पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचे फोटो आणि सीडीज कुठे गेल्या?सीबीआयसाठी सवाल

1. सीबीआयकडे तपास सुपूर्त झाल्यानंतर सर्व आरोपींचे जबाब त्यांना जेलमध्येच घेण्याची परवानगी मिळाली होती. पुरावे स्थानिक पोलिसांकडून मिळाले होते. तरी त्यानंतर 47 दिवसात सीबीआयचा तपास पुढे का गेला नाही ?2. बीपीसीएल कंपनीकडून गोळा केलेल्या कागदपत्रांमधून काय पुढे आले ?3. मोबाईल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीतून काय सिद्ध झाले ?4. फोरेन्सीक एक्झॅमिनेशनसाठी दिल्लीला पाठवलेल्या सोनवणेंच्या फोनचा रिपोर्ट अजून का आला नाही? 5. मोक्का लावलेले सर्व आरोपी एकाच सिंडीकेटचे मेंबर असल्याचे पुरावे सीबीआय अद्यापपर्यंत का देऊ शकली नाही?

महसूल आणि पोलीस यंत्रणेचे लागेबांधे !

यशवंत सोनवणे जळीतकांडानंतर तेल भेसळीसोबत आणखी एक गंभीर वास्तव पुढे आलं. ते म्हणजे राज्यातील तेल माफियांसोबत महसूल आणि पोलीस यंत्रणेचे असलेले लागेबांधे. त्यानंतर 24 तासात पोलिसांनी घातलेल्या धाडींच्या देखाव्यामुळे सामान्यांच्या संताप तीव्र झाला होती.

तेलभेसळीचं समूळ उच्चाटण करण्यासाठी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत होती. शेवटी 8 फेब्रुवारीला गृहखात्याने या प्रकरणातल्या आरोपींविरोधात मोक्काची कारवाई केली.

त्यात निलंबित पोलीस अधिकारी जगन पिंपळे, मदन गटालिया आणि धीरज येवले यांनाही हा मोक्का लावण्यात आला. मात्र 80 दिवसात यातल्या एकाही आरोपीला पोलीस ताब्यात घेवू शकले नाहीत. उलट 15 जूनपर्यंत यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close