S M L

दहशतवादी हल्यासाठी पाकच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही - गिलानी

30 मेभारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण खात्याच्या सचिवांची बैठक आजपासून सुरु होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एक सकारात्मक विधान केलं आहे. दुसर्‍या देशावरील दहशतवादी हल्यासाठी पाकच्या भूमीचा वापर करु दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. तब्बल 3 वर्षानंतर सियाचेन प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान संरक्षण सचिव स्तरावर चर्चा सुरु होत आहे. 1972 च्या शिमला करारानूसार सियाचीनमध्ये जी सैन्यसंख्या निश्चित केली होती तीच आताही कायम ठेवावी अशी पाकिस्तानची भुमिका आहे. पण त्याआधी सध्याची पाकिस्तानची सैन्य संख्या घोषित करावी अशी भारताची भुमिका आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 12:30 PM IST

दहशतवादी हल्यासाठी पाकच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही - गिलानी

30 मे

भारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण खात्याच्या सचिवांची बैठक आजपासून सुरु होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एक सकारात्मक विधान केलं आहे.

दुसर्‍या देशावरील दहशतवादी हल्यासाठी पाकच्या भूमीचा वापर करु दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. तब्बल 3 वर्षानंतर सियाचेन प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान संरक्षण सचिव स्तरावर चर्चा सुरु होत आहे.

1972 च्या शिमला करारानूसार सियाचीनमध्ये जी सैन्यसंख्या निश्चित केली होती तीच आताही कायम ठेवावी अशी पाकिस्तानची भुमिका आहे. पण त्याआधी सध्याची पाकिस्तानची सैन्य संख्या घोषित करावी अशी भारताची भुमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close