S M L

शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

01 जूनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोमवारी केलेल्या टीकेनंतर आज शिवसैनिकांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत वरळी नाक्यावर संतप्त शिवसैनिकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला. तर कोल्हापुर जिल्ह्यातील कागल येथे शिवसैनिकांनी आंदोलन केलं कागल बसस्थानक परिसरात अजित पवारांचा पुतळा जाळला. तर खान्देशात अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करीत त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. या आंदोलनात शिवसैनिकांबरोबर आरपीआय कार्यकर्तेही सहभागी झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करुन घेणार नाही. अजित पवार यांनी त्वरीत माफी मागावी अशी मागणी या कार्यकर्त्यांची होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 03:00 PM IST

शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

01 जून

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोमवारी केलेल्या टीकेनंतर आज शिवसैनिकांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत वरळी नाक्यावर संतप्त शिवसैनिकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला. तर कोल्हापुर जिल्ह्यातील कागल येथे शिवसैनिकांनी आंदोलन केलं कागल बसस्थानक परिसरात अजित पवारांचा पुतळा जाळला.

तर खान्देशात अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करीत त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. या आंदोलनात शिवसैनिकांबरोबर आरपीआय कार्यकर्तेही सहभागी झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करुन घेणार नाही. अजित पवार यांनी त्वरीत माफी मागावी अशी मागणी या कार्यकर्त्यांची होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close