S M L

शिवसेना-राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला

02 जूनअजित पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. तर आता अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीतला संघर्ष आता पेटला आहे. पुण्यामध्ये सिटी पोस्ट चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असाच संघर्ष झाला. एकमेकांविरोधात निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. तर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते शाम देशपांडे, नाना वाडेकर यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सिटी पोस्ट चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. तर शिवसेनेनंही राष्ट्रवादीविरोधात निदर्शनं सुरू केली. दरम्यान या आंदोलनात सामना वृत्तपत्र जाळण्यात आल्यामुळेच कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पण राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांवर कारवाई का करण्यात आली नाही असा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी केला.कोल्हापूरमध्येही राजाराम चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. अजित पवारांचा अफजलखानच्या वेशातला प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्यांनी घोषणा दिल्या. अमरावतीमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 05:02 PM IST

शिवसेना-राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला

02 जून

अजित पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. तर आता अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीतला संघर्ष आता पेटला आहे. पुण्यामध्ये सिटी पोस्ट चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असाच संघर्ष झाला.

एकमेकांविरोधात निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. तर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते शाम देशपांडे, नाना वाडेकर यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सिटी पोस्ट चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. तर शिवसेनेनंही राष्ट्रवादीविरोधात निदर्शनं सुरू केली.

दरम्यान या आंदोलनात सामना वृत्तपत्र जाळण्यात आल्यामुळेच कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पण राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांवर कारवाई का करण्यात आली नाही असा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी केला.

कोल्हापूरमध्येही राजाराम चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. अजित पवारांचा अफजलखानच्या वेशातला प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्यांनी घोषणा दिल्या. अमरावतीमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close