S M L

झहीर साईंच्या चरणी ; पालिकेकडून सत्कार

03 जूनभारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकत 28 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली. भारताला जग जिंकून देण्यार्‍या या खेळाडूंना देशवासीयांनी डोक्यावर घेतलं. सरकारतर्फे वेगवेगळे पुरस्कार तर दिलेच त्यासोबत घसघशीत बक्षीस ही दिली. आज झहीर खानच्या गावी झहीरला घरचा आहेर मिळाला आहे. झहीरचा श्रीरामपूर नगर पालिकेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये दोन लाखांचा चेक त्याला देण्यात आला. पण झहीरने हा दोन लाखांचा चेक नव्याने बांधण्यात येणार्‍या श्रीरामपूर स्टेडियमला योगदान म्हणून परत केला आहे. सत्कारापूर्वी झहीर खानने शिर्डीला साईबाबांचंही दर्शन घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 10:07 AM IST

झहीर साईंच्या चरणी ; पालिकेकडून सत्कार

03 जून

भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकत 28 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली. भारताला जग जिंकून देण्यार्‍या या खेळाडूंना देशवासीयांनी डोक्यावर घेतलं. सरकारतर्फे वेगवेगळे पुरस्कार तर दिलेच त्यासोबत घसघशीत बक्षीस ही दिली.

आज झहीर खानच्या गावी झहीरला घरचा आहेर मिळाला आहे. झहीरचा श्रीरामपूर नगर पालिकेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये दोन लाखांचा चेक त्याला देण्यात आला.

पण झहीरने हा दोन लाखांचा चेक नव्याने बांधण्यात येणार्‍या श्रीरामपूर स्टेडियमला योगदान म्हणून परत केला आहे. सत्कारापूर्वी झहीर खानने शिर्डीला साईबाबांचंही दर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close