S M L

लोकलेखाच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये - मुख्यमंत्री

03 जूनमहाराष्ट्राच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्षांबरोबर चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितलं. सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत लोकलेखा समितीच्या काही सदस्यांनी राजीनामा दिले होते.गेल्या वर्षभरापासून नाराज झालेल्या सदस्यांनी राजीनामा दिला आहे. एकूण 25 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये 20 सदस्य हे विधानसभेतील आहे तर 5 सदस्य विधानपरिषदेतील आहे. लोकलेखा समितीत काही पक्षांच्या सदस्य ही आहे. यामध्ये अध्यक्ष भाजपचे गिरीष बापट, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, शेकापच्या मिनाक्षी पाटील, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेना एकनाथ शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर तसेच विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दादा देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, विनोद तावडे भाजप, दिपक सावंत शिवसेना आदी सभासदांनी आपला राजीनामा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 12:52 PM IST

लोकलेखाच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये - मुख्यमंत्री

03 जून

महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्षांबरोबर चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितलं. सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत लोकलेखा समितीच्या काही सदस्यांनी राजीनामा दिले होते.

गेल्या वर्षभरापासून नाराज झालेल्या सदस्यांनी राजीनामा दिला आहे. एकूण 25 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये 20 सदस्य हे विधानसभेतील आहे तर 5 सदस्य विधानपरिषदेतील आहे.

लोकलेखा समितीत काही पक्षांच्या सदस्य ही आहे. यामध्ये अध्यक्ष भाजपचे गिरीष बापट, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, शेकापच्या मिनाक्षी पाटील, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेना एकनाथ शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर तसेच विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दादा देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, विनोद तावडे भाजप, दिपक सावंत शिवसेना आदी सभासदांनी आपला राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close