S M L

तरूण म्हणता, यशस्वी होण्यासाठी सेक्स, रिश्वत इटस ओके !

03 जूनबाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडलंय. यापूर्वी अण्णा हजारेंनी आपल्या आंदोलनामुळे देशभरात भ्रष्टाचारविरोधी वातावरण निर्माण केलं. त्यांच्या या आंदोलनाला तरुणांचाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. पण भ्रष्टाचाराविरोधात देशातील चित्र आशादायक आहे का हा प्रश्न आहे. देशातल्या 50 टक्के तरुणांना लाच देण्यात किंवा घेण्यात काही गैर वाटत नाही. एमटिव्ही या वाहिनेनं केलेल्या सर्व्हेमधून हे समोर आलंय.नुकत्याच झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात देशभरातील तरुणांनी उत्स्फूर्त भाग घेतला. पण भ्रष्टाचारविरोधात रस्त्यावर उतरणारे सर्वच तरुण वैयक्तिक जीवनात भ्रष्टाचार टाळतात असं मात्र नाही. एका सर्व्हे अंतर्गत 13 शहरातल्या 18 ते 25 वयोगटातल्या 2400 तरुणांशी एमटीव्हीनं बातचीत केली.धक्क्दायक गोष्ट म्हणजे त्यापैकी निम्म्याहून अधिक तरुणांनी लाच देण्यात काही गैर नसल्याचं म्हटलं आहे. लाच देण्याविषयी 53 टक्के तरूण म्हणता लाच देणं योग्य, तर 39 टक्के तरुणांना लाच घेण्यात काही गैर वाटत नाही. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं नसेल. पण तरुणांचे हे दुसरं एक मत पाहा. जीवनात यशस्वी होण्यासाठी शरीरसंबध ठेवण्यात काही चुकीचं नाही असं 47 टक्के तरुणांना वाटते. पण प्रत्येकालाच मात्र असं वाटत नाही.आदित्य स्वामी म्हणतो, सध्या प्रत्येक जणच स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत आहे. तिथूनच भ्रष्टाचार आणि हव्यासाचा जन्म होतो.90 टक्के तरुणांना आपल्या आईवडिलांच्या कमाईपेक्षा जास्त उत्पन्न मिळवायचं आहे. पण तरुणांना पैसा इतका महत्त्वाचा का वाटतो ? तरुणांचं हे मत पाहा. 85 टक्के तरुणांना वाटतं की पैशामुळे सत्ता मिळते. 64 टक्के तरुणांना वाटतं की पैशामुळे त्यांच्या सेक्स अपीलमध्ये वाढ होते. आणि 90 टक्के तरुणांचं मत आहे की पैशामुळे सुखसमृद्धी मिळते.पण हा पैसा मिळवण्यासाठी तरुण कोणत्या मार्गाचा अवलंब करणे पसंत करतात..? 60 टक्के तरुणांना पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट पसंत आहे.लाचखोरीबद्दल तरुणांचं मत53% - लाच देणं योग्य 39% - लाच घेणं योग्य शरीर संबंधाबद्दल तरुणांचं मत- 47% - यशस्वी होण्यासाठी शरीरसंबध ठेवणं चुकीचं नाहीपैशाबद्दल तरुणांचं मत- 90% - आईवडिलांच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न हवं - 85% - पैशामुळे सत्ता मिळते- 64% - पैशामुळे सेक्स अपील वाढतं - 90% - पैशामुळे सुखसमृद्धी मिळतेपैसा मिळवण्याचा मार्ग- 60% - पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट पसंत

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 04:56 PM IST

तरूण म्हणता, यशस्वी होण्यासाठी सेक्स, रिश्वत इटस ओके !

03 जून

बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडलंय. यापूर्वी अण्णा हजारेंनी आपल्या आंदोलनामुळे देशभरात भ्रष्टाचारविरोधी वातावरण निर्माण केलं. त्यांच्या या आंदोलनाला तरुणांचाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पण भ्रष्टाचाराविरोधात देशातील चित्र आशादायक आहे का हा प्रश्न आहे. देशातल्या 50 टक्के तरुणांना लाच देण्यात किंवा घेण्यात काही गैर वाटत नाही. एमटिव्ही या वाहिनेनं केलेल्या सर्व्हेमधून हे समोर आलंय.

नुकत्याच झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात देशभरातील तरुणांनी उत्स्फूर्त भाग घेतला. पण भ्रष्टाचारविरोधात रस्त्यावर उतरणारे सर्वच तरुण वैयक्तिक जीवनात भ्रष्टाचार टाळतात असं मात्र नाही. एका सर्व्हे अंतर्गत 13 शहरातल्या 18 ते 25 वयोगटातल्या 2400 तरुणांशी एमटीव्हीनं बातचीत केली.

धक्क्दायक गोष्ट म्हणजे त्यापैकी निम्म्याहून अधिक तरुणांनी लाच देण्यात काही गैर नसल्याचं म्हटलं आहे. लाच देण्याविषयी 53 टक्के तरूण म्हणता लाच देणं योग्य, तर 39 टक्के तरुणांना लाच घेण्यात काही गैर वाटत नाही.

हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं नसेल. पण तरुणांचे हे दुसरं एक मत पाहा. जीवनात यशस्वी होण्यासाठी शरीरसंबध ठेवण्यात काही चुकीचं नाही असं 47 टक्के तरुणांना वाटते. पण प्रत्येकालाच मात्र असं वाटत नाही.

आदित्य स्वामी म्हणतो, सध्या प्रत्येक जणच स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत आहे. तिथूनच भ्रष्टाचार आणि हव्यासाचा जन्म होतो.

90 टक्के तरुणांना आपल्या आईवडिलांच्या कमाईपेक्षा जास्त उत्पन्न मिळवायचं आहे. पण तरुणांना पैसा इतका महत्त्वाचा का वाटतो ? तरुणांचं हे मत पाहा. 85 टक्के तरुणांना वाटतं की पैशामुळे सत्ता मिळते. 64 टक्के तरुणांना वाटतं की पैशामुळे त्यांच्या सेक्स अपीलमध्ये वाढ होते. आणि 90 टक्के तरुणांचं मत आहे की पैशामुळे सुखसमृद्धी मिळते.पण हा पैसा मिळवण्यासाठी तरुण कोणत्या मार्गाचा अवलंब करणे पसंत करतात..? 60 टक्के तरुणांना पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट पसंत आहे.लाचखोरीबद्दल तरुणांचं मत53% - लाच देणं योग्य 39% - लाच घेणं योग्य शरीर संबंधाबद्दल तरुणांचं मत- 47% - यशस्वी होण्यासाठी शरीरसंबध ठेवणं चुकीचं नाहीपैशाबद्दल तरुणांचं मत- 90% - आईवडिलांच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न हवं - 85% - पैशामुळे सत्ता मिळते- 64% - पैशामुळे सेक्स अपील वाढतं - 90% - पैशामुळे सुखसमृद्धी मिळतेपैसा मिळवण्याचा मार्ग- 60% - पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट पसंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close