S M L

सरकारकडून बाबांची मनधरणी सुरूच

04 जूनबाबा रामदेव आणि सरकार यांच्यात चर्चा अजूनही सुरू आहे. जोपर्यंत सर्व मुद्द्यांवर शंभर टक्के एकमत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बाबांनी व्यक्त केला आहे. बाबा रामदेव सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. त्यासाठी त्यांनी दोन तासांचा ब्रेक घेतला आहे. ज्या मागण्या मान्य आहेत ते सरकारने लिखीत द्यावं आणि त्यावर ताबडतोब पावलं उचलावीत असं रामदेव यांचं म्हणणं आहे. काही मागण्या सरकारला मान्य आहेत पण काही मागण्यांवर पूर्ण सहमती होऊ शकलेली नसल्याचंही बाबांनी सांगितलं आहे. दरम्यान बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आज सकाळी सुरूवात झाली. हजारो समर्थक त्यांच्या उपोषणस्थळी रामलीला मैदानावर जमले आहे. बाबांच्या सत्याग्रहाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. आज दिवसभरात साधारणपणे 75 हजार समर्थक रामलीला मैदानावर भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा बाबा रामदेव यांनी सरकारला दिला आहे. तसेच आपल्या आंदोलनामागे कोणाताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसेच आपल्या सत्याग्रहाला 17 देशांतल्या भारतीयांनी पाठिंबा दिल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 11:31 AM IST

सरकारकडून बाबांची मनधरणी सुरूच

04 जून

बाबा रामदेव आणि सरकार यांच्यात चर्चा अजूनही सुरू आहे. जोपर्यंत सर्व मुद्द्यांवर शंभर टक्के एकमत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बाबांनी व्यक्त केला आहे. बाबा रामदेव सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. त्यासाठी त्यांनी दोन तासांचा ब्रेक घेतला आहे.

ज्या मागण्या मान्य आहेत ते सरकारने लिखीत द्यावं आणि त्यावर ताबडतोब पावलं उचलावीत असं रामदेव यांचं म्हणणं आहे. काही मागण्या सरकारला मान्य आहेत पण काही मागण्यांवर पूर्ण सहमती होऊ शकलेली नसल्याचंही बाबांनी सांगितलं आहे.

दरम्यान बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आज सकाळी सुरूवात झाली. हजारो समर्थक त्यांच्या उपोषणस्थळी रामलीला मैदानावर जमले आहे. बाबांच्या सत्याग्रहाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

आज दिवसभरात साधारणपणे 75 हजार समर्थक रामलीला मैदानावर भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा बाबा रामदेव यांनी सरकारला दिला आहे.

तसेच आपल्या आंदोलनामागे कोणाताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसेच आपल्या सत्याग्रहाला 17 देशांतल्या भारतीयांनी पाठिंबा दिल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close