S M L

सातपुड्याला हिरवी शाल पांघरण्यासाठी संघटनांची धडपड

प्रशांत बाग, जळगांव04 जूनखान्देशचं वैभव म्हणून ओळख असलेला सातपुडा सध्या प्रचंड वृक्षतोडीमुळे बोडका होत आहे. याच सातपुड्याला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील बारा पर्यावरणवादी संघटना एकत्र आल्या आहे. सातपुड्याला पुन्हा हिरवी शाल पांघरण्यासाठी धडपड करणार्‍या या कार्यकर्त्याची ही जिद्द नक्कीच वाखाणण्यासारखी. एकेकाळी घनदाट दंडकारण्य असणारा सातपुडा आता वृक्षतोडीन बोडखा होत चालला. या महाकाय सातपुडयाने पांघरलेली हिरवी शाल गायब झाली. गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांशी महाराष्ट्र सातपुडा पर्वतानं जोडलंय. यांच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या फैजपूरमध्ये तापमान 49.4 अंश सेल्सीअस पर्यंत गेलं होतं.ग्लोबल वार्मिंग आणि त्यातच जंगलतोड तापमान तर वाढतंचं आहे शिवाय या जंगलतोडीमुळे दुर्मिळ वनौषधीची नष्ट होत आहे. त्यामुळेच सातपुडा वाचवण्याचा निर्णय काही तरुणांनी घेतला आहे. आणि त्यासाठीच मग एकत्र आल्या पर्यावरणवादी 12 संघटना.सातपुड्याच्या दर्‍या खोर्‍यांत काम करणारे कार्यकर्ते कधीच प्रकाशात नसतात.आदिवासीचे प्रश्न, वनसंपत्तीचे महत्व त्यांना सांगण्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागांत ही मंडळी काम करतात. हे सगळेजण पहिल्यांदाच एकत्र आले ते सातपुड्याचं हिरवं वैभवं परत मिळवून देण्यासाठी या सगळ्यांना एकंच ध्यास आहे तो या वसुंधरेला पुन्हा एकदा सजवण्याचा आपल्या पुढच्या पिढीसाठी ही वनसंपत्ती वाचवण्याचा.!

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 11:48 AM IST

सातपुड्याला हिरवी शाल पांघरण्यासाठी संघटनांची धडपड

प्रशांत बाग, जळगांव

04 जून

खान्देशचं वैभव म्हणून ओळख असलेला सातपुडा सध्या प्रचंड वृक्षतोडीमुळे बोडका होत आहे. याच सातपुड्याला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील बारा पर्यावरणवादी संघटना एकत्र आल्या आहे. सातपुड्याला पुन्हा हिरवी शाल पांघरण्यासाठी धडपड करणार्‍या या कार्यकर्त्याची ही जिद्द नक्कीच वाखाणण्यासारखी.

एकेकाळी घनदाट दंडकारण्य असणारा सातपुडा आता वृक्षतोडीन बोडखा होत चालला. या महाकाय सातपुडयाने पांघरलेली हिरवी शाल गायब झाली.

गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांशी महाराष्ट्र सातपुडा पर्वतानं जोडलंय. यांच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या फैजपूरमध्ये तापमान 49.4 अंश सेल्सीअस पर्यंत गेलं होतं.

ग्लोबल वार्मिंग आणि त्यातच जंगलतोड तापमान तर वाढतंचं आहे शिवाय या जंगलतोडीमुळे दुर्मिळ वनौषधीची नष्ट होत आहे. त्यामुळेच सातपुडा वाचवण्याचा निर्णय काही तरुणांनी घेतला आहे. आणि त्यासाठीच मग एकत्र आल्या पर्यावरणवादी 12 संघटना.

सातपुड्याच्या दर्‍या खोर्‍यांत काम करणारे कार्यकर्ते कधीच प्रकाशात नसतात.आदिवासीचे प्रश्न, वनसंपत्तीचे महत्व त्यांना सांगण्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागांत ही मंडळी काम करतात.

हे सगळेजण पहिल्यांदाच एकत्र आले ते सातपुड्याचं हिरवं वैभवं परत मिळवून देण्यासाठी या सगळ्यांना एकंच ध्यास आहे तो या वसुंधरेला पुन्हा एकदा सजवण्याचा आपल्या पुढच्या पिढीसाठी ही वनसंपत्ती वाचवण्याचा.!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close