S M L

मला मारण्याचा कट, काही झाल्यास सोनिया गांधी जबाबदार !

05 जूनमाझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. तसेच बाबांना अटक करून एन्काऊंटर करण्यात यावं किंवा कुठे तरी गायब करण्यात यावं असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी हरिद्वारला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी केलं. मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी कारवाई केली. बाबांना ताब्यात घेऊन डेहाडूनमार्गे हरिव्दारला पंताजली आश्रमात पाठवण्यात आले. नेहमी भगव्या वस्त्रांमध्ये असणारे बाबा पत्रकार परिषदेत सलवार कुर्ता दुपट्टा घालून आले या पत्रकार परिषदेत बाबा म्हणाले, तब्बल दोन तास पोलिसांची कारवाई रामलीला मैदानावर सुरू होती. पोलीस अश्रुधूरांचे गोळे कार्यकर्त्यांवर बरसावत होते एका भिंतीचा आसरा घेऊन मी दोन तास तिथे बसून होतो. जेव्हा अश्रुधूरांचा प्रभाव कमी झाला तेव्हा मी पाहिले की काही महिलांना पोलीस जबरदस्तीनं हटवत होते. पूर्ण मंडपात गोंधळ सुरू होता.कार्यकर्त्यांना लाठीमार सुरू होती.महिलांवर अत्याचार सुरू होता हे सांगताना बाबा रामदेव यांना अश्रु आवरले नाही. कपिल सिब्बल यांचा समाचार घेत बाबा म्हणाले,सरकार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहे आम्हाला फसवण्यात आलं आहे. एका हॉटेलमध्ये बोलावून सोनिया गांधी, पंतप्रधान यांच्याशी फोनवर बोलून आमच्यावर दबाव टाकून तीन दिवसात मागण्या मान्य करण्यात येईल असं पत्र लिहून घेतलं. यामागे कपिल सिब्बल यांचा कट डाव होता अशी टीका ही बाबांनी केली. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर बाबा रामदेव यांचे समर्थक ांमध्ये तीव्र नाराजी आहे. बाबांना त्यांच्या पासून लांब केल्याने त्यांचा राग अनावर झाला आहे. पोलिसांच्या अत्याचारावर त्यांना आक्षेप आहे. अचानक मध्यरात्रीचं पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणार्‍या बाबा रामदेव यांना हटवण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. रामदेव बाबांना लवकरात लवकर सोडलं नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला आहे. मध्यरात्री पोलिसांनी जेव्हा बाबा रामदेव यांना ताब्यात घेतलं तेव्हा समर्थकांनी जोरात घोषणाबाजी केली. बाबांच्या भोवती असलेल्या समर्थकांना हकलवण्यासाठी पोलिसांनी सगळे मार्ग अवलंबवले. मंडप तोडून टाकला. लोकांवर अश्रुधूराचे गोळे सोडले. या दरम्यान अनेकजण जखमी झाले. कोणाला धाप लागली. तर कोणी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. पोलिसांच्या या दडपशाही विरोधात आता सगळ्याच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारनं संपवलं. आधी मागण्या मान्य करून नंतर फसवणूक केल्याचा आरोप बाबांनी काल केला होता. त्यावर बाबांनीच फसवणूक केली अशी उलटी आवई काँग्रेसन उठवली. देशभरात बाबांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे नक्की खरं कोण असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.सरकारने फसवणूक केली असा आरोप करून बाबांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मनधरणीचे मंत्र्याचे प्रयत्न सुरुच होते किमान सरकार तस भासवतं होतं. अगदी मध्यरात्रीपर्यंत सरकार मागण्या मान्य करत असल्याचं चित्रं दिसत होत. मात्र सरकारने पलटी खात थेट पोलीस कारवाई केली. बाबांना ताब्यात घेतलं. आणि रामलीलावर जमावबंदी केली. समर्थकांना बाहेर काढलं. आणि बाबांनीच सरकारला फसवलं आहे कारवाईचं मग काँग्रेसनं असं समर्थन केलं.सरकार आणि बाबा दोघांनीही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप केले. दुसरीकडे बाबांच्या समर्थक मात्र सरकारच्या या दडपशाहीवर संतापले आहेत.आधी मनधरण ,नंतर पोलीस कारवाई करून उचलबांगडी आणि आता फसवाफसवीचे आरोप बाबा आणि सरकारचा हा कुठला नवीन 'योग' असा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे.तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आता बाबा रामदेवांवर टीका करत आहे. बाबा रामदेव चिडून सरकारवर आगपाखड करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी केला आहे. त्यांच्या मते सरकारने काळ्या पैशावर बाबांच्या मागण्या मान्य केल्यात. पण सरकारच्या कारवाईचा त्यांना राग आल्याचं सहाय यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारचं कृत्य लोकशाहीवर घाला असल्याची सडकून टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन गडकरी यांनी केली आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज संध्याकाळी 7 पासून भाजप करणार सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 10:23 AM IST

मला मारण्याचा कट, काही झाल्यास सोनिया गांधी जबाबदार !

05 जून

माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. तसेच बाबांना अटक करून एन्काऊंटर करण्यात यावं किंवा कुठे तरी गायब करण्यात यावं असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी हरिद्वारला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी केलं.

मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी कारवाई केली. बाबांना ताब्यात घेऊन डेहाडूनमार्गे हरिव्दारला पंताजली आश्रमात पाठवण्यात आले. नेहमी भगव्या वस्त्रांमध्ये असणारे बाबा पत्रकार परिषदेत सलवार कुर्ता दुपट्टा घालून आले या पत्रकार परिषदेत बाबा म्हणाले, तब्बल दोन तास पोलिसांची कारवाई रामलीला मैदानावर सुरू होती.

पोलीस अश्रुधूरांचे गोळे कार्यकर्त्यांवर बरसावत होते एका भिंतीचा आसरा घेऊन मी दोन तास तिथे बसून होतो. जेव्हा अश्रुधूरांचा प्रभाव कमी झाला तेव्हा मी पाहिले की काही महिलांना पोलीस जबरदस्तीनं हटवत होते. पूर्ण मंडपात गोंधळ सुरू होता.कार्यकर्त्यांना लाठीमार सुरू होती.महिलांवर अत्याचार सुरू होता हे सांगताना बाबा रामदेव यांना अश्रु आवरले नाही.

कपिल सिब्बल यांचा समाचार घेत बाबा म्हणाले,सरकार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहे आम्हाला फसवण्यात आलं आहे. एका हॉटेलमध्ये बोलावून सोनिया गांधी, पंतप्रधान यांच्याशी फोनवर बोलून आमच्यावर दबाव टाकून तीन दिवसात मागण्या मान्य करण्यात येईल असं पत्र लिहून घेतलं. यामागे कपिल सिब्बल यांचा कट डाव होता अशी टीका ही बाबांनी केली.

काल रात्री झालेल्या कारवाईनंतर बाबा रामदेव यांचे समर्थक ांमध्ये तीव्र नाराजी आहे. बाबांना त्यांच्या पासून लांब केल्याने त्यांचा राग अनावर झाला आहे. पोलिसांच्या अत्याचारावर त्यांना आक्षेप आहे.

अचानक मध्यरात्रीचं पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणार्‍या बाबा रामदेव यांना हटवण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. रामदेव बाबांना लवकरात लवकर सोडलं नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला आहे.

मध्यरात्री पोलिसांनी जेव्हा बाबा रामदेव यांना ताब्यात घेतलं तेव्हा समर्थकांनी जोरात घोषणाबाजी केली. बाबांच्या भोवती असलेल्या समर्थकांना हकलवण्यासाठी पोलिसांनी सगळे मार्ग अवलंबवले. मंडप तोडून टाकला. लोकांवर अश्रुधूराचे गोळे सोडले. या दरम्यान अनेकजण जखमी झाले. कोणाला धाप लागली. तर कोणी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. पोलिसांच्या या दडपशाही विरोधात आता सगळ्याच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारनं संपवलं. आधी मागण्या मान्य करून नंतर फसवणूक केल्याचा आरोप बाबांनी काल केला होता. त्यावर बाबांनीच फसवणूक केली अशी उलटी आवई काँग्रेसन उठवली. देशभरात बाबांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे नक्की खरं कोण असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

सरकारने फसवणूक केली असा आरोप करून बाबांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मनधरणीचे मंत्र्याचे प्रयत्न सुरुच होते किमान सरकार तस भासवतं होतं.

अगदी मध्यरात्रीपर्यंत सरकार मागण्या मान्य करत असल्याचं चित्रं दिसत होत. मात्र सरकारने पलटी खात थेट पोलीस कारवाई केली. बाबांना ताब्यात घेतलं. आणि रामलीलावर जमावबंदी केली. समर्थकांना बाहेर काढलं. आणि बाबांनीच सरकारला फसवलं आहे कारवाईचं मग काँग्रेसनं असं समर्थन केलं.

सरकार आणि बाबा दोघांनीही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप केले. दुसरीकडे बाबांच्या समर्थक मात्र सरकारच्या या दडपशाहीवर संतापले आहेत.

आधी मनधरण ,नंतर पोलीस कारवाई करून उचलबांगडी आणि आता फसवाफसवीचे आरोप बाबा आणि सरकारचा हा कुठला नवीन 'योग' असा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे.तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आता बाबा रामदेवांवर टीका करत आहे. बाबा रामदेव चिडून सरकारवर आगपाखड करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी केला आहे. त्यांच्या मते सरकारने काळ्या पैशावर बाबांच्या मागण्या मान्य केल्यात. पण सरकारच्या कारवाईचा त्यांना राग आल्याचं सहाय यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारचं कृत्य लोकशाहीवर घाला असल्याची सडकून टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन गडकरी यांनी केली आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज संध्याकाळी 7 पासून भाजप करणार सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close