S M L

बाबांवर कारवाईच्या निषेधात अण्णांचे 8 जूनला उपोषण

05 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारने चिरडलं आहे. सरकारच्या या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा घोटला आहे. ही कारवाई लोकशाहीला कलंक आहे याचा निषेध करण्यासाठी 8 जूनला दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे अशी घोषणा ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. तसेच उद्या होणार्‍या लोकपाल समितीच्या बैठकीचं व्हिडिओ शुटिंग करण्यात यावे जर सरकारला ही मागणी मान्य नसेल तर या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही असं ही अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. तर बाबा रामदेव यांची अजून भेट झाली नाही या उपोषणासाठी बाबांच्या सहभागी होण्याचा निर्णय हा त्यांना भेटल्यावरच होईल असंही अण्णांनी स्पष्ट केलं. आमच्या मध्ये कोणतेही मतभेद नाही थोड्याफार गोष्टी असता त्यांची चर्चा करावी लागते यासंदर्भात एक दोन दिवसात खुलासा केला जाईल.तसेच सरकारने दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात कोणालाही आंदोलन करू देणार नाही असा सवाल विचारला असता अण्णा म्हणाले की, दिल्ली ही कोणाच्या वडिलांनी विकत घेतली की वडिलांची संपत्ती आहे ही लोकशाही आहे लोकशाही जर असं कोणीही मान्य करत असेल तर ते चुकीचं आहे ही सर्व जनतांची संपत्ती आहे. जे लोक सत्तेत बसले आहे ते सर्व सेवक आहे त्यांनी जनतेचं ऐकलंच पाहिजे असं ठणकावून ही अण्णांनी सांगितलं. तसेच देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असं ही अण्णांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा केली. यावेळी लोकपाल समितीचे सदस्य अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेष, शांती भूषण आणि प्रशांत भूषण हजर होते. दरम्यान दुपारी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेष, शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांची महाराष्ट्रात सदनात बैठक झाली.या बैठकीत सशर्त सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तसेच बैठकीचं व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 01:26 PM IST

बाबांवर कारवाईच्या निषेधात अण्णांचे 8 जूनला उपोषण

05 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारने चिरडलं आहे. सरकारच्या या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा घोटला आहे. ही कारवाई लोकशाहीला कलंक आहे याचा निषेध करण्यासाठी 8 जूनला दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे अशी घोषणा ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

तसेच उद्या होणार्‍या लोकपाल समितीच्या बैठकीचं व्हिडिओ शुटिंग करण्यात यावे जर सरकारला ही मागणी मान्य नसेल तर या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही असं ही अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. तर बाबा रामदेव यांची अजून भेट झाली नाही या उपोषणासाठी बाबांच्या सहभागी होण्याचा निर्णय हा त्यांना भेटल्यावरच होईल असंही अण्णांनी स्पष्ट केलं.

आमच्या मध्ये कोणतेही मतभेद नाही थोड्याफार गोष्टी असता त्यांची चर्चा करावी लागते यासंदर्भात एक दोन दिवसात खुलासा केला जाईल.तसेच सरकारने दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात कोणालाही आंदोलन करू देणार नाही असा सवाल विचारला असता अण्णा म्हणाले की, दिल्ली ही कोणाच्या वडिलांनी विकत घेतली की वडिलांची संपत्ती आहे ही लोकशाही आहे लोकशाही जर असं कोणीही मान्य करत असेल तर ते चुकीचं आहे ही सर्व जनतांची संपत्ती आहे. जे लोक सत्तेत बसले आहे ते सर्व सेवक आहे त्यांनी जनतेचं ऐकलंच पाहिजे असं ठणकावून ही अण्णांनी सांगितलं.

तसेच देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असं ही अण्णांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा केली. यावेळी लोकपाल समितीचे सदस्य अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेष, शांती भूषण आणि प्रशांत भूषण हजर होते.

दरम्यान दुपारी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेष, शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांची महाराष्ट्रात सदनात बैठक झाली.या बैठकीत सशर्त सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तसेच बैठकीचं व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close