S M L

पुन्हा करणार सत्याग्रह !

05 जूनदिल्लीतलं आंदोलन सरकारनं उधळल्यानंतर आता बाबा रामदेव यांनी पुन्हा सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे. पतंजली योगपीठातूनच सत्याग्रह सुरू करणार असल्याचे बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये जाहीर केलं. उपोषण शांततेत पार पाडू देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना विनंती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने आपल्याला मारण्याचा कट आखला होता असा आरोप त्यांनी केला आहे. आणि आपल्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं. सोनिया गांधी जन्माने भारतीय नसल्यामुळेच त्यांनी ही क्रूर कारवाई केली अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली. माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. तसेच बाबांना अटक करून एन्काऊंटर करण्यात यावं किंवा कुठे तरी गायब करण्यात यावं असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी हरिद्वारला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी केलं. मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी कारवाई केली. बाबांना ताब्यात घेऊन डेहाडूनमार्गे हरिव्दारला पंताजली आश्रमात पाठवण्यात आले. नेहमी भगव्या वस्त्रांमध्ये असणारे बाबा पत्रकार परिषदेत सलवार कुर्ता दुपट्टा घालून आले या पत्रकार परिषदेत बाबा म्हणाले, तब्बल दोन तास पोलिसांची कारवाई रामलीला मैदानावर सुरू होती. पोलीस अश्रुधूरांचे गोळे कार्यकर्त्यांवर बरसावत होते एका भिंतीचा आसरा घेऊन मी दोन तास तिथे बसून होतो. जेव्हा अश्रुधूरांचा प्रभाव कमी झाला तेव्हा मी पाहिले की काही महिलांना पोलीस जबरदस्तीनं हटवत होते. पूर्ण मंडपात गोंधळ सुरू होता. कार्यकर्त्यांना लाठीमार सुरू होती.महिलांवरही अत्याचार सुरू होता हे सांगताना बाबा रामदेव यांना अश्रु आवरले नाही.कपिल सिब्बल यांचा समाचार घेत बाबा म्हणाले,सरकार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहे आम्हाला फसवण्यात आलं आहे. एका हॉटेलमध्ये बोलावून सोनिया गांधी, पंतप्रधान यांच्याशी फोनवर बोलून आमच्यावर दबाव टाकून तीन दिवसात मागण्या मान्य करण्यात येईल असं पत्र लिहून घेतलं. यामागे कपिल सिब्बल यांचा कट डाव होता अशी टीका ही बाबांनी केली. इतर बातम्या- मला मारण्याचा कट, काही झाल्यास सोनिया गांधी जबाबदार ! बाबांवर कारवाईच्या निषेधात अण्णांचे 8 जूनला उपोषण रामलीलावर मध्यरात्री घडलेला घटनाक्रम

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 05:16 PM IST

पुन्हा करणार सत्याग्रह !

05 जून

दिल्लीतलं आंदोलन सरकारनं उधळल्यानंतर आता बाबा रामदेव यांनी पुन्हा सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे. पतंजली योगपीठातूनच सत्याग्रह सुरू करणार असल्याचे बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये जाहीर केलं.

उपोषण शांततेत पार पाडू देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना विनंती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने आपल्याला मारण्याचा कट आखला होता असा आरोप त्यांनी केला आहे. आणि आपल्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं. सोनिया गांधी जन्माने भारतीय नसल्यामुळेच त्यांनी ही क्रूर कारवाई केली अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली. माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास, त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. तसेच बाबांना अटक करून एन्काऊंटर करण्यात यावं किंवा कुठे तरी गायब करण्यात यावं असं खळबळजनक वक्तव्य बाबा रामदेव यांनी हरिद्वारला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी केलं.

मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी कारवाई केली. बाबांना ताब्यात घेऊन डेहाडूनमार्गे हरिव्दारला पंताजली आश्रमात पाठवण्यात आले. नेहमी भगव्या वस्त्रांमध्ये असणारे बाबा पत्रकार परिषदेत सलवार कुर्ता दुपट्टा घालून आले या पत्रकार परिषदेत बाबा म्हणाले, तब्बल दोन तास पोलिसांची कारवाई रामलीला मैदानावर सुरू होती.

पोलीस अश्रुधूरांचे गोळे कार्यकर्त्यांवर बरसावत होते एका भिंतीचा आसरा घेऊन मी दोन तास तिथे बसून होतो. जेव्हा अश्रुधूरांचा प्रभाव कमी झाला तेव्हा मी पाहिले की काही महिलांना पोलीस जबरदस्तीनं हटवत होते. पूर्ण मंडपात गोंधळ सुरू होता. कार्यकर्त्यांना लाठीमार सुरू होती.महिलांवरही अत्याचार सुरू होता हे सांगताना बाबा रामदेव यांना अश्रु आवरले नाही.

कपिल सिब्बल यांचा समाचार घेत बाबा म्हणाले,सरकार माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहे आम्हाला फसवण्यात आलं आहे. एका हॉटेलमध्ये बोलावून सोनिया गांधी, पंतप्रधान यांच्याशी फोनवर बोलून आमच्यावर दबाव टाकून तीन दिवसात मागण्या मान्य करण्यात येईल असं पत्र लिहून घेतलं. यामागे कपिल सिब्बल यांचा कट डाव होता अशी टीका ही बाबांनी केली.

इतर बातम्या-

मला मारण्याचा कट, काही झाल्यास सोनिया गांधी जबाबदार ! बाबांवर कारवाईच्या निषेधात अण्णांचे 8 जूनला उपोषण रामलीलावर मध्यरात्री घडलेला घटनाक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close