S M L

आंदोलनाचा हट्टहास करणे चुकीचा - राज ठाकरे

06 जूनरामदेव बाबा यांचे आंदोलन दडपणे गैर आहे यात कोणताही वाद नाही पण सतत उपोषण करून सरकारला धारेवर धरणं हे योग्य आहे का तपासुन पाहणे गरजेच आहे. कोणत्याही प्रकारची सरकारशी चर्चा न करता उपोषणावर बसणं चुकीचं आहे. तसेच हजार -पाचशे नोटांमुळे काळा पैशाची वाढ होते यामुळे 500 आणि 1000 रूपयांच्या चलनी नोटा बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी करत येणार्‍या पोट निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. राज ठाकरे यांनी कुष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.तसेच अण्णा हजारे यांनी उपोषण केलं त्यानंतर बाबा रामदेव यांनी उपोषण केलं खर पाहता यामागे विरोधी पक्ष कमकुवत आहे हे यावरून स्पष्ट आहे. जे काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे ते सामाजिक कार्याकर्त्यांना करावे लागत आहे. आणि यानंतर यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्याचा आणि राडा निर्माण करायचा हे चुकीचं आहे अशी टीका राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर केली. तर काळा पैसा भारतात आलाचं पाहिजे पण यासाठी ज्या स्विस बँकेत पैसा ठेवला आहे त्या देशाच्या सरकारशी, बँकेशी कायदेशीर चर्चा झाली पाहिजे नेमका यातून मार्ग कसा निघणार हे पाहिलं पाहिजे. हे सर्व लक्षात न घेता उपोषणाला बसणं योग्य नाहीच. जर या उपोषणाचं विरोधी पक्षांना फायदा घ्याचा असेल तर तर काळा पैसा देशात आणण्याची जबाबदारी घ्यावी. नुसती लोकांची माथी भडकवून निवडणूक लढायची आणि आणि सत्ता स्थापन करायची याला आपला विरोध आहे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 05:52 PM IST

आंदोलनाचा हट्टहास करणे चुकीचा - राज ठाकरे

06 जून

रामदेव बाबा यांचे आंदोलन दडपणे गैर आहे यात कोणताही वाद नाही पण सतत उपोषण करून सरकारला धारेवर धरणं हे योग्य आहे का तपासुन पाहणे गरजेच आहे. कोणत्याही प्रकारची सरकारशी चर्चा न करता उपोषणावर बसणं चुकीचं आहे.

तसेच हजार -पाचशे नोटांमुळे काळा पैशाची वाढ होते यामुळे 500 आणि 1000 रूपयांच्या चलनी नोटा बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी करत येणार्‍या पोट निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. राज ठाकरे यांनी कुष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

तसेच अण्णा हजारे यांनी उपोषण केलं त्यानंतर बाबा रामदेव यांनी उपोषण केलं खर पाहता यामागे विरोधी पक्ष कमकुवत आहे हे यावरून स्पष्ट आहे. जे काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे ते सामाजिक कार्याकर्त्यांना करावे लागत आहे. आणि यानंतर यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्याचा आणि राडा निर्माण करायचा हे चुकीचं आहे अशी टीका राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर केली.

तर काळा पैसा भारतात आलाचं पाहिजे पण यासाठी ज्या स्विस बँकेत पैसा ठेवला आहे त्या देशाच्या सरकारशी, बँकेशी कायदेशीर चर्चा झाली पाहिजे नेमका यातून मार्ग कसा निघणार हे पाहिलं पाहिजे.

हे सर्व लक्षात न घेता उपोषणाला बसणं योग्य नाहीच. जर या उपोषणाचं विरोधी पक्षांना फायदा घ्याचा असेल तर तर काळा पैसा देशात आणण्याची जबाबदारी घ्यावी. नुसती लोकांची माथी भडकवून निवडणूक लढायची आणि आणि सत्ता स्थापन करायची याला आपला विरोध आहे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close