S M L

मायावतींच्या 'हत्ती'विरोधात भाजपात उमा 'भरती'

07 जूनउमा भारती यांच्यासाठी पुन्हा एकदा भाजपची दारं उघडली गेली आहे. उमा भारतींनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत घोषणा केली. यापुढे उमा भारतींवर उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षशिस्त मोडल्याबद्दल डिसेंबर 2005 मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणींनी "जिनांच्या" केलेल्या स्तुतीवर उमाभारतींनी हरकत घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवली होती. त्यावर त्यांनी अडवाणींवरच बेशिस्तीचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टीची मागणी केली होती. पक्षातून बाहेर पडत त्यांनी भारतीय जनशक्ती पक्ष स्थापन केला. सोमवारी हरिद्वार इथं रामदेव बाबांच्या उपोषणाला उपस्थित राहून त्यांना आपला पाठिंबा ही दर्शवला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 09:10 AM IST

मायावतींच्या 'हत्ती'विरोधात भाजपात उमा 'भरती'

07 जून

उमा भारती यांच्यासाठी पुन्हा एकदा भाजपची दारं उघडली गेली आहे. उमा भारतींनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत घोषणा केली. यापुढे उमा भारतींवर उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षशिस्त मोडल्याबद्दल डिसेंबर 2005 मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणींनी "जिनांच्या" केलेल्या स्तुतीवर उमाभारतींनी हरकत घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवली होती.

त्यावर त्यांनी अडवाणींवरच बेशिस्तीचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टीची मागणी केली होती. पक्षातून बाहेर पडत त्यांनी भारतीय जनशक्ती पक्ष स्थापन केला. सोमवारी हरिद्वार इथं रामदेव बाबांच्या उपोषणाला उपस्थित राहून त्यांना आपला पाठिंबा ही दर्शवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close