S M L

फी वाढीची तक्रार केली म्हणून 8 विद्यार्थ्यांना शाळेतूनच काढून टाकले

07 जूननवी मुंबईतील टिळक इंटरनॅशनल स्कूलने शाळेच्या पहिल्याच दिवशी 8 विद्यार्थ्यांना काढून टाकले आहे. या मुलांच्या पालकांनी फी वाढीविरोधात आंदोलन केलं होतं. घणसोलीच्या टिळक इंटरनॅशल स्कूलने गेल्या वर्षी 500 रुपयांनी स्कूल फी वाढवली. त्याविरोधात शाळेतल्या 8 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवाज उठवला होता. आयुष देशमुख, खुषी जैयस्वाल, प्रथमेश साळूंखे, कृतिका गावडे, मृदूला गायकवाड, दिपेश गुप्ता, आकांक्षा गुप्ता आणि रवि माने अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत. ही सर्व मुलं 3 री ते 8 वी इयत्तेत शिकत आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून मुख्याध्यापक उषा विल्सन यांनी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांना काढून टाकलं असा आरोप पालकांनी केला आहे. या कारवाईविषयी कोणत्याच प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असंही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 03:37 PM IST

फी वाढीची तक्रार केली म्हणून 8 विद्यार्थ्यांना शाळेतूनच काढून टाकले

07 जून

नवी मुंबईतील टिळक इंटरनॅशनल स्कूलने शाळेच्या पहिल्याच दिवशी 8 विद्यार्थ्यांना काढून टाकले आहे. या मुलांच्या पालकांनी फी वाढीविरोधात आंदोलन केलं होतं. घणसोलीच्या टिळक इंटरनॅशल स्कूलने गेल्या वर्षी 500 रुपयांनी स्कूल फी वाढवली. त्याविरोधात शाळेतल्या 8 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवाज उठवला होता.

आयुष देशमुख, खुषी जैयस्वाल, प्रथमेश साळूंखे, कृतिका गावडे, मृदूला गायकवाड, दिपेश गुप्ता, आकांक्षा गुप्ता आणि रवि माने अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत. ही सर्व मुलं 3 री ते 8 वी इयत्तेत शिकत आहेत.

त्यांनी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून मुख्याध्यापक उषा विल्सन यांनी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांना काढून टाकलं असा आरोप पालकांनी केला आहे. या कारवाईविषयी कोणत्याच प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असंही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close