S M L

...तर 16 ऑगस्टपासून पुन्हा उपोषण - अण्णा हजारे

08 जूनबाबा रामदेव यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध म्हणून अण्णा हजारेंनी आज एक दिवसांचं उपोषण केलं. राजघाटवर केलेल्या या उपोषणात अण्णांची लोकपाल समितीतील टीम आणि सर्वसामान्य लोकांनी भाग घेतला. बाबा रामदेव यांच्या आंदोलनाप्रमाणे या सत्याग्रहात ग्लॅमर किंवा झगमगाट नव्हता. पण आंदोलन उभं करून आपण सरकारवर दबाव टाकू शकतो, हे दाखवण्याचा अण्णांच्या टीमनं प्रयत्न केला. यावेळी अण्णांनी 15 ऑगस्टपर्यंत लोकपाल बिल तयार झालं नाही तर 16 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार अशी घोषणा केली आहे. राजघाटवर संगीत आणि नृत्य यांच्या तालात भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन पार पडलं. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते अर्थातच अण्णा हजारे. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांनी त्यांना उत्सफूर्त पाठिंबा दिला.अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहातला मुख्य फरक म्हणजे, आंदोलनाच्या नियोजनाचा. बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहात धार्मिक नेत्यांची उपस्थिती आणि आर्थिक सुखसोयींची रेलचेल पाहायला मिळाली. तर अण्णा हजारे यांचं आंदोलन साधं होतं आणि त्याला देशभक्तीची झालर असल्याचं दिसलं.5 एप्रिल रोजी जंतरमंतरवर झालेल्या आणि आता राजघाटवर झालेल्या आंदोलनात फरक करायचा झाल्यास ते आंदोलन आतापेक्षा अधिक उत्स्फूर्त होतं. लोक स्वतःहून त्यात भाग घेत होते. आताचं आंदोलन खूपच नियोजित आणि सुरक्षेच्या निर्बंधात अडकलेलं आढळलं. राजघाटवर येण्यासाठी पोलिसांनी समर्थक तसेच मीडियाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला.गेल्यावेळेपेक्षा अर्थातच या आंदोलनात लोकांचा कमी सहभाग दिसून आला. पण यामुळे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा आपला निर्धार ढळणार नाही, असा विश्‍वास समर्थकांनी व्यक्त केला.बाबा रामदेव किंवा अण्णांच्याच पूर्वीच्या सत्याग्रहापेक्षा अण्णांच्या आताच्या आंदोलनात झगमगाट आणि गर्दी भले कमी असेल पण यामुळे सरकारवरचा दबाव मात्र निश्चितच कायम राहणार आहे.दरम्यान, अण्णा हजारे यांनी सरकार आणि मंत्र्यांवर टीका केली. सर्व मंत्र्यांना संसदीय लोकशाहीचे प्रशिक्षण दिलं पाहिजे असं अण्णांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 09:42 AM IST

...तर 16 ऑगस्टपासून पुन्हा उपोषण - अण्णा हजारे

08 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध म्हणून अण्णा हजारेंनी आज एक दिवसांचं उपोषण केलं. राजघाटवर केलेल्या या उपोषणात अण्णांची लोकपाल समितीतील टीम आणि सर्वसामान्य लोकांनी भाग घेतला.

बाबा रामदेव यांच्या आंदोलनाप्रमाणे या सत्याग्रहात ग्लॅमर किंवा झगमगाट नव्हता. पण आंदोलन उभं करून आपण सरकारवर दबाव टाकू शकतो, हे दाखवण्याचा अण्णांच्या टीमनं प्रयत्न केला. यावेळी अण्णांनी 15 ऑगस्टपर्यंत लोकपाल बिल तयार झालं नाही तर 16 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार अशी घोषणा केली आहे.

राजघाटवर संगीत आणि नृत्य यांच्या तालात भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन पार पडलं. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते अर्थातच अण्णा हजारे. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांनी त्यांना उत्सफूर्त पाठिंबा दिला.

अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहातला मुख्य फरक म्हणजे, आंदोलनाच्या नियोजनाचा. बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहात धार्मिक नेत्यांची उपस्थिती आणि आर्थिक सुखसोयींची रेलचेल पाहायला मिळाली. तर अण्णा हजारे यांचं आंदोलन साधं होतं आणि त्याला देशभक्तीची झालर असल्याचं दिसलं.

5 एप्रिल रोजी जंतरमंतरवर झालेल्या आणि आता राजघाटवर झालेल्या आंदोलनात फरक करायचा झाल्यास ते आंदोलन आतापेक्षा अधिक उत्स्फूर्त होतं. लोक स्वतःहून त्यात भाग घेत होते.

आताचं आंदोलन खूपच नियोजित आणि सुरक्षेच्या निर्बंधात अडकलेलं आढळलं. राजघाटवर येण्यासाठी पोलिसांनी समर्थक तसेच मीडियाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला.

गेल्यावेळेपेक्षा अर्थातच या आंदोलनात लोकांचा कमी सहभाग दिसून आला. पण यामुळे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा आपला निर्धार ढळणार नाही, असा विश्‍वास समर्थकांनी व्यक्त केला.

बाबा रामदेव किंवा अण्णांच्याच पूर्वीच्या सत्याग्रहापेक्षा अण्णांच्या आताच्या आंदोलनात झगमगाट आणि गर्दी भले कमी असेल पण यामुळे सरकारवरचा दबाव मात्र निश्चितच कायम राहणार आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी सरकार आणि मंत्र्यांवर टीका केली. सर्व मंत्र्यांना संसदीय लोकशाहीचे प्रशिक्षण दिलं पाहिजे असं अण्णांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close