S M L

हुसेन यांचा दफनविधी भारतात करावा - राज ठाकरे

09 जूनएम.एफ हुसेन हे महान कलावंत होते. ते देशाची संपत्ती होते. त्यांचा दफनविधी भारतातच झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांना हुसेन यांनी एक खास चित्र भेट दिलं होतं. त्याविषयीच्या आठवणीही हुसेन यांनी सांगितल्या राज ठाकरे म्हणाले की, एम.एफ हुसेन यांच्या चित्रातील रंगसंगती,लाईन्स हे सर्व विलक्षण होतं. मध्यंतरी त्यांच्या चित्रांमुळे वाद झाला त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. हुसेन यांना हे सर्व का करावे लागले हे मात्र काही कळु शकले नाही. या सर्व प्रकरणाबद्दल त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली होती. पण एक चित्रकार म्हणून खूप मोठा माणुस होता. रिऍलिस्टीक चित्रांमध्ये मोठा हातखंडा होता. त्यामुळे ते इतके मोठे कलावंत होऊ शकले. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे त्यांचा चित्रकला समजण्या ऐवजी त्या चित्रांची किंमतीवरच जास्त चर्चा झाली. आता ती लोक त्यांच्या चित्रांची किंमत काढण्यासाठी बाजारात सैरभैर फिरत असतील ही गोष्ट खरचं दुदैर्वी आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची बायपास सर्जरी झाली होती तेव्हा हॉस्पिटलच्या व्हरांड्यात त्यांची भेट झाली होती.बाळासाहेबांच्या भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी गणरायचं एक सुंदर चित्र काढलं आणि बाळासाहेबांना गेट वेल सून असं लिहुन दिलं होतं. असा एक उमदा कलाकार होता. त्यामुळे पिकासो यांची जर हुसेन यांच्याशी तुलना करायची असेल तर एम.एफ. हुसेन नेहमी उजवे वाटतात. एम.एफ. हुसेन हे महाराष्ट्रातील पंढरपूरचे होते महाराष्ट्रातला एवढा मोठा कलावंत आपल्यातून गेला याचं दु:ख आहे त्यामुळे त्यांचं दफणविधी भारतात झालं पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 10:34 AM IST

हुसेन यांचा दफनविधी भारतात करावा - राज ठाकरे

09 जून

एम.एफ हुसेन हे महान कलावंत होते. ते देशाची संपत्ती होते. त्यांचा दफनविधी भारतातच झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांना हुसेन यांनी एक खास चित्र भेट दिलं होतं. त्याविषयीच्या आठवणीही हुसेन यांनी सांगितल्या राज ठाकरे म्हणाले की, एम.एफ हुसेन यांच्या चित्रातील रंगसंगती,लाईन्स हे सर्व विलक्षण होतं. मध्यंतरी त्यांच्या चित्रांमुळे वाद झाला त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. हुसेन यांना हे सर्व का करावे लागले हे मात्र काही कळु शकले नाही. या सर्व प्रकरणाबद्दल त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली होती.

पण एक चित्रकार म्हणून खूप मोठा माणुस होता. रिऍलिस्टीक चित्रांमध्ये मोठा हातखंडा होता. त्यामुळे ते इतके मोठे कलावंत होऊ शकले. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे त्यांचा चित्रकला समजण्या ऐवजी त्या चित्रांची किंमतीवरच जास्त चर्चा झाली.

आता ती लोक त्यांच्या चित्रांची किंमत काढण्यासाठी बाजारात सैरभैर फिरत असतील ही गोष्ट खरचं दुदैर्वी आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची बायपास सर्जरी झाली होती तेव्हा हॉस्पिटलच्या व्हरांड्यात त्यांची भेट झाली होती.बाळासाहेबांच्या भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी गणरायचं एक सुंदर चित्र काढलं आणि बाळासाहेबांना गेट वेल सून असं लिहुन दिलं होतं.

असा एक उमदा कलाकार होता. त्यामुळे पिकासो यांची जर हुसेन यांच्याशी तुलना करायची असेल तर एम.एफ. हुसेन नेहमी उजवे वाटतात. एम.एफ. हुसेन हे महाराष्ट्रातील पंढरपूरचे होते महाराष्ट्रातला एवढा मोठा कलावंत आपल्यातून गेला याचं दु:ख आहे त्यामुळे त्यांचं दफणविधी भारतात झालं पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close