S M L

हुसेन यांनी कलेसाठी हट्ट नाही देश सोडला - शिवसेनाप्रमुख

09 जूनएम.एफ. हुसेन फार जिद्दी होते. हुसेन हा एक विक्षिप्त आणि जिद्दी माणूस होता. कलेच्याबाबत त्याने हट्ट नाही देश सोडला. हुसेननं मॉडर्न आर्टचं काम जिद्दीने सांभाळलं. हिंदू देवतांचे चित्रे काढली तिथेच तो घसरला. त्याच्या जाण्याने मॉडर्न आर्टचे नुकसान झाले असेल तर झाले. अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली.जगप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं निधन झालं आहे. लंडनच्या रॉयल ब्रॉम्टन हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता त्यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या चित्रांनी भारतीयच नव्हे तर जगभरातल्या चित्ररसिकांना भुरळ घातली होती. पिकासो ऑफ इंडिया म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. भारत सरकारने त्यांचा पद्ममभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.दरम्यान एम.एफ हुसेन हे महान कलावंत होते. ते देशाची संपत्ती होते. त्यांचा दफनविधी भारतातच झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांना हुसेन यांनी एक खास चित्र भेट दिलं होतं. त्याविषयीच्या आठवणीही हुसेन यांनी सांगितल्या राज ठाकरे म्हणाले की, एम.एफ हुसेन यांच्या चित्रातील रंगसंगती,लाईन्स हे सर्व विलक्षण होतं. मध्यंतरी त्यांच्या चित्रांमुळे वाद झाला त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. हुसेन यांना हे सर्व का करावे लागले हे मात्र काही कळु शकले नाही. या सर्व प्रकरणाबद्दल त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची बायपास सर्जरी झाली होती तेव्हा हॉस्पिटलच्या व्हरांड्यात त्यांची भेट झाली होती. बाळासाहेबांच्या भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी गणरायचं एक सुंदर चित्र काढलं आणि बाळासाहेबांना गेट वेल सून असं लिहुन दिलं होतं. असा एक उमदा कलाकार होता. त्यामुळे पिकासो यांची जर हुसेन यांच्याशी तुलना करायची असेल तर एम.एफ. हुसेन नेहमी उजवे वाटतात. एम.एफ. हुसेन हे महाराष्ट्रातील पंढरपूरचे होते महाराष्ट्रातला एवढा मोठा कलावंत आपल्यातून गेला याचं दु:ख आहे त्यामुळे त्यांचं दफणविधी भारतात झालं पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 04:52 PM IST

हुसेन यांनी कलेसाठी हट्ट नाही देश सोडला - शिवसेनाप्रमुख

09 जून

एम.एफ. हुसेन फार जिद्दी होते. हुसेन हा एक विक्षिप्त आणि जिद्दी माणूस होता. कलेच्याबाबत त्याने हट्ट नाही देश सोडला. हुसेननं मॉडर्न आर्टचं काम जिद्दीने सांभाळलं. हिंदू देवतांचे चित्रे काढली तिथेच तो घसरला. त्याच्या जाण्याने मॉडर्न आर्टचे नुकसान झाले असेल तर झाले. अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली.

जगप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं निधन झालं आहे. लंडनच्या रॉयल ब्रॉम्टन हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता त्यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या चित्रांनी भारतीयच नव्हे तर जगभरातल्या चित्ररसिकांना भुरळ घातली होती. पिकासो ऑफ इंडिया म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. भारत सरकारने त्यांचा पद्ममभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

दरम्यान एम.एफ हुसेन हे महान कलावंत होते. ते देशाची संपत्ती होते. त्यांचा दफनविधी भारतातच झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांना हुसेन यांनी एक खास चित्र भेट दिलं होतं. त्याविषयीच्या आठवणीही हुसेन यांनी सांगितल्या राज ठाकरे म्हणाले की, एम.एफ हुसेन यांच्या चित्रातील रंगसंगती,लाईन्स हे सर्व विलक्षण होतं.

मध्यंतरी त्यांच्या चित्रांमुळे वाद झाला त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. हुसेन यांना हे सर्व का करावे लागले हे मात्र काही कळु शकले नाही. या सर्व प्रकरणाबद्दल त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची बायपास सर्जरी झाली होती तेव्हा हॉस्पिटलच्या व्हरांड्यात त्यांची भेट झाली होती.

बाळासाहेबांच्या भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी गणरायचं एक सुंदर चित्र काढलं आणि बाळासाहेबांना गेट वेल सून असं लिहुन दिलं होतं. असा एक उमदा कलाकार होता. त्यामुळे पिकासो यांची जर हुसेन यांच्याशी तुलना करायची असेल तर एम.एफ. हुसेन नेहमी उजवे वाटतात.

एम.एफ. हुसेन हे महाराष्ट्रातील पंढरपूरचे होते महाराष्ट्रातला एवढा मोठा कलावंत आपल्यातून गेला याचं दु:ख आहे त्यामुळे त्यांचं दफणविधी भारतात झालं पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close