S M L

गोपीनाथ मुंडेंचा मौनराग

10 जूनभाजपमधील गोपीनाथ मुंडेंची नाराजी नवी नाही. तसेच मुंडेची काँग्रेसच्या नेत्यांबरोबरची सलगीदेखील भाजप नेत्यांना चांगलीच परिचित आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशी नितीन गडकरींची भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक केली तशी गोपीनाथ मुंडेंची चलबिचल वाढलीय. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आज ना उद्या ओबीसीचा प्रयोग करतील किंवा काँग्रेसच्या मार्गावर जातील अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नेहमीच असते. त्यातच उमा भारतीच्या भाजप प्रवेश झाला आणि गोपीनाथ मुंडे चांगलेच अस्वस्थ झाले. सूत्रांच्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख कामाला लागले आहेत. विलासरावांनीच बुधवारी दिल्लीत गोपीनाथ मुंडेची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखजीर्ंशी भेट घडवून आणली. त्यानंतर गुरूवारच्या मुंबईमधील शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याला मुंडे गैरहजर राहिले.सध्या गोपीनाथ मुंडे प्रसारमाध्यमाशी बोलत नाही. पण ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याला खुद्द विलासरावांनीच नकळत दुजोरा दिला.वाढतं वय आणि इतर पक्षातल्या ओबीसी नेत्यांची झालेली पंचाईत यामुळे गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा प्रयोग करणं जड जाणार आहे. त्यामानाने काँग्रेसचा पर्याय हा कधीही चांगला असा विचार गोपीनाथ मुंडे करत असावेत.तर भाजपच्या राज्यातल्या राजकारणावर अजूनही गोपीनाथ मुंडेंचा अजूनही वचक आहे. राज्यातलेच नव्हे तर देशातील एक प्रमुख ओबीसी नेते अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच खासदार बनून दिल्लीत गेल्यावर भाजपने गोपीनाथ मुंडेंना लोकसभेच्या उपनेत्याचं पद दिलं. अजूनही त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रदेश भाजपमध्ये निर्णय घेतला जात नाही हे तितकंच खंर आहे. पण एकाएकी पुणे शहर भाजप अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. आणि अचानक गोपीनाथ मुंडे पुण्याच्या शिवशक्ती- भिमशक्तीच्या मेळाव्याला गैरहजर राहिले. तेव्हापासून '' मुंडे नाराज आहेत... मुंडे रूसून आहेत... मुंडे अस्वस्थ आहेत... अशा बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यात गुरूवारच्या आझाद मैदानावरील शिवशक्ती- भिमशक्तीच्या मेळाव्याला गोपीनाथ मुंडे गैरहजर राहिल्यामुळे सगळं काही आलबेल नाही हे तर स्पष्टच झालं. खरं तर, पुणे शहर भाजप अध्यक्षपदाच्या वादावरून नाराज होतील. इतके लहानसहान नेते गोपीनाथ मुंडे नक्कीच नाहीत. त्यांच्या नाराजीचे कारण वेगळेच आहे. आणि ते दिल्लीतल्या घडामोडींमध्ये आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या कार्यकारिणीत गोपीनाथ मुंडे एकमेव पॉवरफुल ओबीसी नेते आहेत. त्यात लोकसभेतल्या आपल्या परफार्मन्समुळे गोपीनाथ मुंडे सर्वांचे लक्ष वेधत आहे. म्हणूनच मुंडेंना शह देण्यासाठी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उमा भारतींना पक्षात परत आणलं. एवढंच नाही तर उमा भारतींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या प्रचाराची धुरा दिली. त्यामुळे साहिजिकच गोपीनाथ मुंडेंच्या भाजप कार्यकारिणीतल्या सर्वात मोठे ओबीसी नेतेपद धोक्यात आलं आहे. थोडक्यात काय, उमा भारतींच्या पक्षप्रवेश करून नितीन गडकरींनी शह दिल्यामुळे मुंडे अधिकच अस्वस्थ झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2011 07:46 AM IST

गोपीनाथ  मुंडेंचा मौनराग

10 जून

भाजपमधील गोपीनाथ मुंडेंची नाराजी नवी नाही. तसेच मुंडेची काँग्रेसच्या नेत्यांबरोबरची सलगीदेखील भाजप नेत्यांना चांगलीच परिचित आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशी नितीन गडकरींची भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक केली तशी गोपीनाथ मुंडेंची चलबिचल वाढलीय.

त्यामुळे गोपीनाथ मुंडे आज ना उद्या ओबीसीचा प्रयोग करतील किंवा काँग्रेसच्या मार्गावर जातील अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नेहमीच असते. त्यातच उमा भारतीच्या भाजप प्रवेश झाला आणि गोपीनाथ मुंडे चांगलेच अस्वस्थ झाले. सूत्रांच्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख कामाला लागले आहेत.

विलासरावांनीच बुधवारी दिल्लीत गोपीनाथ मुंडेची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखजीर्ंशी भेट घडवून आणली. त्यानंतर गुरूवारच्या मुंबईमधील शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याला मुंडे गैरहजर राहिले.सध्या गोपीनाथ मुंडे प्रसारमाध्यमाशी बोलत नाही. पण ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याला खुद्द विलासरावांनीच नकळत दुजोरा दिला.

वाढतं वय आणि इतर पक्षातल्या ओबीसी नेत्यांची झालेली पंचाईत यामुळे गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा प्रयोग करणं जड जाणार आहे. त्यामानाने काँग्रेसचा पर्याय हा कधीही चांगला असा विचार गोपीनाथ मुंडे करत असावेत.

तर भाजपच्या राज्यातल्या राजकारणावर अजूनही गोपीनाथ मुंडेंचा अजूनही वचक आहे. राज्यातलेच नव्हे तर देशातील एक प्रमुख ओबीसी नेते अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच खासदार बनून दिल्लीत गेल्यावर भाजपने गोपीनाथ मुंडेंना लोकसभेच्या उपनेत्याचं पद दिलं.

अजूनही त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रदेश भाजपमध्ये निर्णय घेतला जात नाही हे तितकंच खंर आहे. पण एकाएकी पुणे शहर भाजप अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. आणि अचानक गोपीनाथ मुंडे पुण्याच्या शिवशक्ती- भिमशक्तीच्या मेळाव्याला गैरहजर राहिले.

तेव्हापासून '' मुंडे नाराज आहेत... मुंडे रूसून आहेत... मुंडे अस्वस्थ आहेत... अशा बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यात गुरूवारच्या आझाद मैदानावरील शिवशक्ती- भिमशक्तीच्या मेळाव्याला गोपीनाथ मुंडे गैरहजर राहिल्यामुळे सगळं काही आलबेल नाही हे तर स्पष्टच झालं. खरं तर, पुणे शहर भाजप अध्यक्षपदाच्या वादावरून नाराज होतील.

इतके लहानसहान नेते गोपीनाथ मुंडे नक्कीच नाहीत. त्यांच्या नाराजीचे कारण वेगळेच आहे. आणि ते दिल्लीतल्या घडामोडींमध्ये आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या कार्यकारिणीत गोपीनाथ मुंडे एकमेव पॉवरफुल ओबीसी नेते आहेत. त्यात लोकसभेतल्या आपल्या परफार्मन्समुळे गोपीनाथ मुंडे सर्वांचे लक्ष वेधत आहे.

म्हणूनच मुंडेंना शह देण्यासाठी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उमा भारतींना पक्षात परत आणलं. एवढंच नाही तर उमा भारतींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या प्रचाराची धुरा दिली. त्यामुळे साहिजिकच गोपीनाथ मुंडेंच्या भाजप कार्यकारिणीतल्या सर्वात मोठे ओबीसी नेतेपद धोक्यात आलं आहे. थोडक्यात काय, उमा भारतींच्या पक्षप्रवेश करून नितीन गडकरींनी शह दिल्यामुळे मुंडे अधिकच अस्वस्थ झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2011 07:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close