S M L

सोलापूर विमानतळ वादाच्या भोव-यात

12 नोव्हेंबर सोलापूरसिद्धार्थ गोदामकाही दिवसांपूर्वी सोलापूर इथलं होडगी विमानतळ सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय श्रेय लाटण्याची चढाओढ सुरू झाली. आणि 15 ऑक्टोबरला सुरू होणारे हे विमानतळाचं काम पुन्हा रखडलं. सोलापूरचे विमानतळ 15 ऑक्टोबरला सुरू केले जाईल हे केंद्रीय उड्डान मंत्री प्रफुल्ल पटेल यांच विधान अजूनही प्रत्यक्षात उतरलेलं नाही. औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणार सोलापूरचं विमानतळ राजकीय चक्रात अडकलं आहे. विजयसिंह मोहीते पाटलांनी होटगीतल्या विमानतळासाठी जोर लावला. तर केंद्रीय उर्जामत्री सुशिलकुमार शिंदे यांनी बोरामणीसाठी. त्यामुळे राजकीय मतभेद उघड झाले. पर्यटनमंत्री विजयसिंह मोहीते पाटील हे सोलापूरचे पालकमंत्रीही आहेत. ते सांगतात आमच्यात मतभेद आहेत कारण शहरी भाग काँग्रेसकडे राहील आणि ग्रामिण भाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील अशी वाटणी या आधी आमच्यात झाली होती. आता होटगी किंवा बोरामणी नव्हे तर विमानतळ, सुशिलकुमार शिंदे यांचं की मोहीते पाटलांचं या मुद्यावर हा वाद आला आहे. प्रत्येक वेळेस होणा-या राजकीय विरोधाला शिंदेही कंटाळले आहेत. विकासात्मक योजनांना विरोध होऊन माझी राजकीय कारकीर्द खराब होत असेल तर मी विकासात्मक योजना आणणार नाही असं केंद्रीय उर्जामत्री सुशिलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. आता निवडणुकीच्या तोंडावर विमानतळाचे भांडवल कोणत्या काँग्रेसला करता येईल ही गणित मांडली जात आहेत. या सर्व राजकीय आखाड्यात सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मात्र खीळ बसली आहे. विमानतळ नाही म्हणून आम्ही अनेक सध्या गमावल्या. विमानतळ नाही म्हणून विदेशी उद्योजक सोलापूरमध्ये येत नाहीतअसं इथल्या उद्योजकांच मत आहे. राजकीय कुरघोडींच्या नादात सोलापूरचा विकास रखडला हे मात्र निश्चित. परंतु त्यासाठी आता सोलापूरकरांनाच जागं व्हावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 12:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close