S M L

काँग्रेस नेत्यांकडून माझ्या बदनामीचा कट - अण्णा हजारे

12 जूनलोकपाल विधेयकासाठी देशव्यापी लढा उभारणारे अण्णा हजारे आणि काँग्रेसमधील संघर्ष आता तीव्र होत चालला आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या काही नेत्यांवर त्यांनी तीव्र टीका केली आहे. त्यावर काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे अण्णा नाराज झाले आहेत. अण्णा हे आरएसएसचा चेहरा असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या अण्णांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलंय. तसेच आपल्या बदनामीची मोहिमच काँग्रेस नेत्यांनी आखल्याचा आरोपही अण्णांनी या पत्रात केला. शूटिंग करायला ही काही सर्कस आहे का - प्रणव मुखर्जीतर दुसरीकडे बाबा रामदेव यांनी उपोषण मागे घेतलंय पण आता काँग्रेस नेत्यांनी थेट अण्णा हजारे आणि नागरी समितीच्या सदस्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली. अण्णा हजारे हे हुकूमशाही करत आहे आणि त्यांच्या आंदोलनामुळे संसदेच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोपही प्रणव मुखर्जी यांनी केला. तसेच मसुदा समितीच्या व्हिडिओ शूटिंगची अरविंद केजरीवाल यांची मागणीही प्रणव मुखजीर्ंनी फेटाळली आहे. तसेच शूटिंग करायला ही काही सर्कस आहे का अशा शब्दात खिल्लीही उडवली आहे. तसेच खासदारांनाही लोकपाल विधेयकाच्या कक्षेत आणण्यास प्रणव मुखजीर्ंनी विरोध दर्शवला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या या भूमिकेमुळे आता नागरी समिती आणि सरकारमधला वाद चिघळण्याची शक्यता आहे.बाबा रामदेव यांचं उपोषण संपल्यानंतर काँग्रेसच्या टार्गेट पॉईंवर आता अण्णा हजारे आहेत. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आधीच लोकपाल विधेयकाच्या मुद्यावरून सरकार आणि नागरी समितीमध्ये सुरू असलेला वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकार आणि नागरी समितीमध्ये गेल्या काही दिवसात चांगलीच जुंपली. आतापर्यंत काठावर बसून हा वाद पाहणारे प्रणव मुखर्जीही आता मैदानात उतरले आहे. बाबा रामदेव यांचं उपोषण संपल्याबरोबर मुखर्जींनी लोकपाल विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. यातून त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही इशारा दिला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या आरोपांनानंतर अण्णांनीही तातडीने सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे काही नेते गेल्या काही दिवसात अण्णा हजारे हे आरएसएस आणि भाजपचा चेहरा असल्याचा आरोप करताहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडून होणार्‍या या आरोपांमुळे अण्णा व्यथीत झाले आहे. लोकपाल विधेयक 15 ऑगस्टपर्यंत संसदेत आलं नाही तर पुन्हा रस्त्यावर येऊन सत्याग्रह करू असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिला. परंतु गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता सरकार या कायद्याबाबत फारसं उत्सुक असल्याचं दिसत नाही. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी तीव्र होणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 12:43 PM IST

काँग्रेस नेत्यांकडून माझ्या बदनामीचा कट - अण्णा हजारे

12 जून

लोकपाल विधेयकासाठी देशव्यापी लढा उभारणारे अण्णा हजारे आणि काँग्रेसमधील संघर्ष आता तीव्र होत चालला आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या काही नेत्यांवर त्यांनी तीव्र टीका केली आहे.

त्यावर काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे अण्णा नाराज झाले आहेत. अण्णा हे आरएसएसचा चेहरा असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या अण्णांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलंय. तसेच आपल्या बदनामीची मोहिमच काँग्रेस नेत्यांनी आखल्याचा आरोपही अण्णांनी या पत्रात केला.

शूटिंग करायला ही काही सर्कस आहे का - प्रणव मुखर्जी

तर दुसरीकडे बाबा रामदेव यांनी उपोषण मागे घेतलंय पण आता काँग्रेस नेत्यांनी थेट अण्णा हजारे आणि नागरी समितीच्या सदस्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली. अण्णा हजारे हे हुकूमशाही करत आहे आणि त्यांच्या आंदोलनामुळे संसदेच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोपही प्रणव मुखर्जी यांनी केला.

तसेच मसुदा समितीच्या व्हिडिओ शूटिंगची अरविंद केजरीवाल यांची मागणीही प्रणव मुखजीर्ंनी फेटाळली आहे. तसेच शूटिंग करायला ही काही सर्कस आहे का अशा शब्दात खिल्लीही उडवली आहे.

तसेच खासदारांनाही लोकपाल विधेयकाच्या कक्षेत आणण्यास प्रणव मुखजीर्ंनी विरोध दर्शवला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या या भूमिकेमुळे आता नागरी समिती आणि सरकारमधला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

बाबा रामदेव यांचं उपोषण संपल्यानंतर काँग्रेसच्या टार्गेट पॉईंवर आता अण्णा हजारे आहेत. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आधीच लोकपाल विधेयकाच्या मुद्यावरून सरकार आणि नागरी समितीमध्ये सुरू असलेला वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकार आणि नागरी समितीमध्ये गेल्या काही दिवसात चांगलीच जुंपली. आतापर्यंत काठावर बसून हा वाद पाहणारे प्रणव मुखर्जीही आता मैदानात उतरले आहे. बाबा रामदेव यांचं उपोषण संपल्याबरोबर मुखर्जींनी लोकपाल विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. यातून त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही इशारा दिला आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या आरोपांनानंतर अण्णांनीही तातडीने सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे काही नेते गेल्या काही दिवसात अण्णा हजारे हे आरएसएस आणि भाजपचा चेहरा असल्याचा आरोप करताहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडून होणार्‍या या आरोपांमुळे अण्णा व्यथीत झाले आहे.

लोकपाल विधेयक 15 ऑगस्टपर्यंत संसदेत आलं नाही तर पुन्हा रस्त्यावर येऊन सत्याग्रह करू असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिला. परंतु गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता सरकार या कायद्याबाबत फारसं उत्सुक असल्याचं दिसत नाही. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी तीव्र होणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close