S M L

सरकारचा आदेश डावलून 2 दिवसाअगोदरच शाळा सुरू

13 जूनसंपूर्ण राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा आदेश सरकारने काढलेला असताना तो न जुमानता अनेक खाजगी शाळा आजपासूनच सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खाजगी शाळांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षात सगळ्या शाळा 15 जूनपासून सुरु कराव्यात असा आदेश एका आठवड्यापूर्वी काढला होता. मात्र तो न जुमानता पुण्यातील स्प्रिंगडेल शाळा आजपासून सुरु झाली. रिझल्टच्या वेळीच शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार शाळा सुरु करत असल्याचे शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र सरकारी आदेशानुसार ज्या शाळा 15 तारखेपासूनचं सुरू होत आहेत. तर शाळेनं विद्यार्थांना कळवलं नसल्याने लांब राहणार्‍या विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले आहे. त्यामुळे आज दिवसभर पुण्यातल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 12:02 PM IST

सरकारचा आदेश डावलून 2 दिवसाअगोदरच शाळा सुरू

13 जून

संपूर्ण राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा आदेश सरकारने काढलेला असताना तो न जुमानता अनेक खाजगी शाळा आजपासूनच सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खाजगी शाळांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षात सगळ्या शाळा 15 जूनपासून सुरु कराव्यात असा आदेश एका आठवड्यापूर्वी काढला होता.

मात्र तो न जुमानता पुण्यातील स्प्रिंगडेल शाळा आजपासून सुरु झाली. रिझल्टच्या वेळीच शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार शाळा सुरु करत असल्याचे शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे.

मात्र सरकारी आदेशानुसार ज्या शाळा 15 तारखेपासूनचं सुरू होत आहेत. तर शाळेनं विद्यार्थांना कळवलं नसल्याने लांब राहणार्‍या विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले आहे. त्यामुळे आज दिवसभर पुण्यातल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close