S M L

नाराज मुंडे भुजबळांच्या भेटीला

13 जूनअस्वस्थ भाजप नेते गोपीनाथ मुंडे रोज एका नव्या चर्चेला तोंड फोडत आहेत. प्रणव मुखर्जी, विलासराव देशमुख आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचीही गोपीनाथ मुंडे यांनी भेट घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या मनात नेमकं काय चाललंय. मुंडेंनी खेळलेल्या वेगळ्या चालींमुळे राज्यात चर्चा तर सुरु झाली आहे. त्याचबरोबर भाजपमध्येही अस्वस्थता दिसू लागली आहे.सध्या गोपीनाथ मुंडे भाजपवर रूसले आहेत,अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हेही कळत नाही. कधी काँग्रेस नेत्यांबरोबरच चर्चा तर कधी काँग्रेस नेत्यांशी फोनाफोनी यामुळे मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याला न कळत काँग्रेसच्या नेत्यांनीही दुजोरा दिला.मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहे म्हणायचं तर मुंडे शिवसेना कार्याध्यक्षांचीही भेट घेतात आणि तीही लपूनछपून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. त्यामुळे मुंडेंची अस्वस्थता आणखीनच चर्चेचा विषय बनली. त्याला दुजोरा गोपीनाथ मुंडेच देताहेत. मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची त्यांच्या रामटेक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोन्हीही ओबीसी नेते, त्यामुळे ओबीसी समीकरणही मुंडेंच्या मनात घोंघावत असावे असा संशय येणं साहजिक आहे.मधल्यामध्ये मुंडे आपल्या कार्यकर्त्यांचीही मतं जाणून घेताहेत की आपली वेगळी फौज उभी करताहेत हेही कळायला मार्ग नाही. पण मुंडेंचे कार्यकर्ते मात्र मुंडेंवर पूर्ण विश्वास दाखवत आहे.दुसरीकडे मुंडेंच्या मनाचा ठाव मात्र भाजप नेत्यांनी घेतलेला दिसतोय. त्यांनी राज्यातील मुंडे समर्थक मानले जाणारे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतलं. त्यामुळे मुंडेंविषयी भाजप श्रेष्ठींच्या मनात काहीतरी वेगळा विचार होतोय हेही स्पष्ट झालंय.गोपिनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांची पत्रकारांनी भेट घेतली असता भुजबळ म्हणाले की, आम्ही दोघं ओबीसीच्या मुद्यावर राज्यात असो अथवा दिल्लीत यावर आमच्यात चर्चा होतं असते. आज मुंडे फक्त चहापानासाठी आले होते त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आम्ही वृत्तवाहिन्यावरून आणि वृत्तपत्रातून पाहत आलो,वाचत आलो पण नेमक मुंडे का नाराज आहे याबद्दल काही सांगता येणार नाही तसे ही त्यांच्या पक्षात काय चाललं आहे हे आम्हाला कसं माहित असणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान मुंडे यांनी शुक्रवारी विलासराव देशमुख यांची ही भेट झाली होती त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरु केल्या आहेत. कार्यकर्त्यांचा आपल्या मागे असणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठबळाची चाचपणी करण्यासाठी मुंडे यांनी या भेटीगाठी वाढवल्याचे म्हटलं जातं आहे. नुकत्याच झालेल्या नगर जिल्ह्यातील दौर्‍यात मुंडे यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला होता. नगर आणि पाथर्डी तालुक्यातही गुप्त दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्याची सुत्रांची माहीती आहे.दरम्यान गोपीनाथ मुंडे हे सध्या नाराज असले तरी ते तूर्तास पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाहीत असे संकेत त्यांच्या मराठवाड्यातील नजीकच्या कार्यकर्त्यांनी दिलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 01:15 PM IST

नाराज मुंडे भुजबळांच्या भेटीला

13 जून

अस्वस्थ भाजप नेते गोपीनाथ मुंडे रोज एका नव्या चर्चेला तोंड फोडत आहेत. प्रणव मुखर्जी, विलासराव देशमुख आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचीही गोपीनाथ मुंडे यांनी भेट घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या मनात नेमकं काय चाललंय. मुंडेंनी खेळलेल्या वेगळ्या चालींमुळे राज्यात चर्चा तर सुरु झाली आहे. त्याचबरोबर भाजपमध्येही अस्वस्थता दिसू लागली आहे.सध्या गोपीनाथ मुंडे भाजपवर रूसले आहेत,अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हेही कळत नाही. कधी काँग्रेस नेत्यांबरोबरच चर्चा तर कधी काँग्रेस नेत्यांशी फोनाफोनी यामुळे मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याला न कळत काँग्रेसच्या नेत्यांनीही दुजोरा दिला.

मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहे म्हणायचं तर मुंडे शिवसेना कार्याध्यक्षांचीही भेट घेतात आणि तीही लपूनछपून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. त्यामुळे मुंडेंची अस्वस्थता आणखीनच चर्चेचा विषय बनली. त्याला दुजोरा गोपीनाथ मुंडेच देताहेत. मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची त्यांच्या रामटेक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोन्हीही ओबीसी नेते, त्यामुळे ओबीसी समीकरणही मुंडेंच्या मनात घोंघावत असावे असा संशय येणं साहजिक आहे.

मधल्यामध्ये मुंडे आपल्या कार्यकर्त्यांचीही मतं जाणून घेताहेत की आपली वेगळी फौज उभी करताहेत हेही कळायला मार्ग नाही. पण मुंडेंचे कार्यकर्ते मात्र मुंडेंवर पूर्ण विश्वास दाखवत आहे.

दुसरीकडे मुंडेंच्या मनाचा ठाव मात्र भाजप नेत्यांनी घेतलेला दिसतोय. त्यांनी राज्यातील मुंडे समर्थक मानले जाणारे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतलं. त्यामुळे मुंडेंविषयी भाजप श्रेष्ठींच्या मनात काहीतरी वेगळा विचार होतोय हेही स्पष्ट झालंय.

गोपिनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांची पत्रकारांनी भेट घेतली असता भुजबळ म्हणाले की, आम्ही दोघं ओबीसीच्या मुद्यावर राज्यात असो अथवा दिल्लीत यावर आमच्यात चर्चा होतं असते. आज मुंडे फक्त चहापानासाठी आले होते त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आम्ही वृत्तवाहिन्यावरून आणि वृत्तपत्रातून पाहत आलो,वाचत आलो पण नेमक मुंडे का नाराज आहे याबद्दल काही सांगता येणार नाही तसे ही त्यांच्या पक्षात काय चाललं आहे हे आम्हाला कसं माहित असणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान मुंडे यांनी शुक्रवारी विलासराव देशमुख यांची ही भेट झाली होती त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरु केल्या आहेत. कार्यकर्त्यांचा आपल्या मागे असणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठबळाची चाचपणी करण्यासाठी मुंडे यांनी या भेटीगाठी वाढवल्याचे म्हटलं जातं आहे.

नुकत्याच झालेल्या नगर जिल्ह्यातील दौर्‍यात मुंडे यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला होता. नगर आणि पाथर्डी तालुक्यातही गुप्त दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्याची सुत्रांची माहीती आहे.

दरम्यान गोपीनाथ मुंडे हे सध्या नाराज असले तरी ते तूर्तास पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाहीत असे संकेत त्यांच्या मराठवाड्यातील नजीकच्या कार्यकर्त्यांनी दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close