S M L

बापूजींच्या चष्मा चोरीचा तपास सीआयडीकडे

14 जूनसेवाग्राम आश्रमात ठेवलेला महात्मा गांधीजीचा चष्मा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चष्मा चोरीला गेल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं. हा चष्मा गांधीजींच्या शिष्या निर्मलाबेन यांनी गांधीजीला भेट दिला होता. सेवाग्राम आश्रमाचा हिरक महोत्सव तीन दिवसावर येऊन ठेपला असतांना आश्रमातील महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. हिरक महोत्सव तीन दिवसावर येऊन ठेपला असतांना आश्रमातून महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती. पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी मुख्यमंत्र्याना या चोरी संदर्भात पत्र लिहील. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यानी गृहसचिवांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चष्मा चोरीला गेल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी सांगितलं. पण 3 महिने उलटून गेल्यावरही अजूनपर्यंत आश्रम प्रतिष्ठाच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. हा चष्मा गांधीजीच्या शिष्या निर्मलाबेन यांनी गांधीजींना भेट दिला होता. दरम्यान आज जिल्हा पोलीस अधिक्षक वाघमारे यांनी आश्रम पदाधिकार्‍यांकडून या बाबत माहिती घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 09:51 AM IST

बापूजींच्या चष्मा चोरीचा तपास सीआयडीकडे

14 जून

सेवाग्राम आश्रमात ठेवलेला महात्मा गांधीजीचा चष्मा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चष्मा चोरीला गेल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं. हा चष्मा गांधीजींच्या शिष्या निर्मलाबेन यांनी गांधीजीला भेट दिला होता.

सेवाग्राम आश्रमाचा हिरक महोत्सव तीन दिवसावर येऊन ठेपला असतांना आश्रमातील महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.

हिरक महोत्सव तीन दिवसावर येऊन ठेपला असतांना आश्रमातून महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती. पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी मुख्यमंत्र्याना या चोरी संदर्भात पत्र लिहील. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यानी गृहसचिवांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यात हा चष्मा चोरीला गेल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी सांगितलं. पण 3 महिने उलटून गेल्यावरही अजूनपर्यंत आश्रम प्रतिष्ठाच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. हा चष्मा गांधीजीच्या शिष्या निर्मलाबेन यांनी गांधीजींना भेट दिला होता. दरम्यान आज जिल्हा पोलीस अधिक्षक वाघमारे यांनी आश्रम पदाधिकार्‍यांकडून या बाबत माहिती घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close