S M L

फाईलची पानं पुन्हा गायब

14 जूनपहिल्यांदा राज्य सरकारच्या नगरविकास विभागातून आदर्श प्रकरणाच्या फाईलमधील महत्त्वाची पानं गायब झाली. त्यावर सुरू झालेला वाद थंडावण्याच्या आतच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातूनही आदर्शच्या फाईलीतून काही पानं गायब झाल्याची बातमी आली. आता त्यात भर पडलीय संरक्षण विभागाची. संरक्षण विभागाच्या मुंबईतल्या ऑफिसमधूनही आदर्श प्रकरणातल्या फाईलमधली काही पानं गायब झाली आहे. संरक्षण विभागाचे वकील धीरेन शहा यांनी आज न्यायमूर्ती जे. ए. पाटील आयोगापुढे ही माहिती दिली. मेजर जनरल एस. एस. जोग यांनी मार्च 2000 मध्ये आदर्श प्रकरणात नापंसती दर्शवणारा शेरा मारला होता. आदर्शच्या सोसायटीच्या बंाधकामाला परवानगी देता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. हाच शेरा असलेली पानं या फाईलमधून गहाळ झाली आहेत. ए. आर. कुमार हे आदर्श प्रकरणात सीबीआयच्या आरोपपत्रातील एक आरोपी आहेत. एस. एस. जोग यांची सध्या न्यायालयीन आयोगासमोर साक्ष नोंदवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, आदर्श फाईल मधील पाने गहाळ प्रकरणी नगर विकास खात्यातून झालेल्या फाईल गहाळप्रकरणी तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. नगर विकास खात्याने निलंबितानाचे आदेश दिले आहे. सीबीआयने तिघांना या प्रकरणी अटक केली होती. टाऊन प्लानर एन. एन. नार्वेकर, डेस्क ऑफिसर गुरुदत्त वाजपे आणि नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांचे क्लार्क वामन राऊळ यांचा त्यात समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 02:14 PM IST

फाईलची पानं पुन्हा गायब

14 जून

पहिल्यांदा राज्य सरकारच्या नगरविकास विभागातून आदर्श प्रकरणाच्या फाईलमधील महत्त्वाची पानं गायब झाली. त्यावर सुरू झालेला वाद थंडावण्याच्या आतच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातूनही आदर्शच्या फाईलीतून काही पानं गायब झाल्याची बातमी आली.

आता त्यात भर पडलीय संरक्षण विभागाची. संरक्षण विभागाच्या मुंबईतल्या ऑफिसमधूनही आदर्श प्रकरणातल्या फाईलमधली काही पानं गायब झाली आहे. संरक्षण विभागाचे वकील धीरेन शहा यांनी आज न्यायमूर्ती जे. ए. पाटील आयोगापुढे ही माहिती दिली. मेजर जनरल एस. एस. जोग यांनी मार्च 2000 मध्ये आदर्श प्रकरणात नापंसती दर्शवणारा शेरा मारला होता.

आदर्शच्या सोसायटीच्या बंाधकामाला परवानगी देता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. हाच शेरा असलेली पानं या फाईलमधून गहाळ झाली आहेत. ए. आर. कुमार हे आदर्श प्रकरणात सीबीआयच्या आरोपपत्रातील एक आरोपी आहेत. एस. एस. जोग यांची सध्या न्यायालयीन आयोगासमोर साक्ष नोंदवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, आदर्श फाईल मधील पाने गहाळ प्रकरणी नगर विकास खात्यातून झालेल्या फाईल गहाळप्रकरणी तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. नगर विकास खात्याने निलंबितानाचे आदेश दिले आहे.

सीबीआयने तिघांना या प्रकरणी अटक केली होती. टाऊन प्लानर एन. एन. नार्वेकर, डेस्क ऑफिसर गुरुदत्त वाजपे आणि नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांचे क्लार्क वामन राऊळ यांचा त्यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close