S M L

मुंडेंच्या नाराजीवर 18 जूनला निघणार तोडगा

15 जूनभाजपचे नाराज नेते गोपीनाथ मुंडेंविषयीचा निर्णय येत्या शनिवारी 28 जूनला होणार आहे. राजधानी दिल्लीत पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती मुंडे आणि गडकरी समोरासमोर चर्चा करणार आहेत. दरम्यान मुंडेंनी आज पुन्हा एकदा समर्थक आमदारांची मुंबईत बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नंतर ते पुन्हा उद्धव ठाकरेंनाही भेटले. नाराज मुंडे कॅमेरासमोर काहीही बोलत नसले. तरी कृतीतून नक्कीच बोलत आहे. मुंबईत त्यांनी पुन्हा समर्थक आमदारांची बैठक घेतली. आणि शक्तिप्रदर्शन करून श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या शहराध्यक्षपदावरून उफाळलेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मुंडेंचं म्हणणं आहे की त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे पंख छाटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. देशमुख-भुजबळांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण मुंडे दुस-या पक्षात जाणार नाहीत असा विश्वास शिष्टाई करणार्‍या खडसेंनी व्यक्त केला.मुंबईत मुंडेंचं भेटसत्र सुरू असताना दिल्लीत प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी श्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आणि मुंडेंचा विषय मांडला. अनेक वरिष्ठ नेते दिल्लीत नसल्यामुळे येत्या शनिवारी किंवा रविवारी बैठक घेऊन सर्व श्रेष्ठींच्या समोर मुंडे - गडकरी मतभेद मिटवतील अशी पक्षातील नेत्यांना अपेक्षा आहे.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मुंडेंसाठी पुढचे तीन दिवस वेळ नसल्यामुळे राज्य भाजपमध्ये झालेली दुफळी पुढचे काही दिवस जैसे थे राहणार हे निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 05:22 PM IST

मुंडेंच्या नाराजीवर 18 जूनला निघणार तोडगा

15 जून

भाजपचे नाराज नेते गोपीनाथ मुंडेंविषयीचा निर्णय येत्या शनिवारी 28 जूनला होणार आहे. राजधानी दिल्लीत पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती मुंडे आणि गडकरी समोरासमोर चर्चा करणार आहेत. दरम्यान मुंडेंनी आज पुन्हा एकदा समर्थक आमदारांची मुंबईत बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नंतर ते पुन्हा उद्धव ठाकरेंनाही भेटले.

नाराज मुंडे कॅमेरासमोर काहीही बोलत नसले. तरी कृतीतून नक्कीच बोलत आहे. मुंबईत त्यांनी पुन्हा समर्थक आमदारांची बैठक घेतली. आणि शक्तिप्रदर्शन करून श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या शहराध्यक्षपदावरून उफाळलेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मुंडेंचं म्हणणं आहे की त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे पंख छाटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. देशमुख-भुजबळांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण मुंडे दुस-या पक्षात जाणार नाहीत असा विश्वास शिष्टाई करणार्‍या खडसेंनी व्यक्त केला.

मुंबईत मुंडेंचं भेटसत्र सुरू असताना दिल्लीत प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी श्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आणि मुंडेंचा विषय मांडला. अनेक वरिष्ठ नेते दिल्लीत नसल्यामुळे येत्या शनिवारी किंवा रविवारी बैठक घेऊन सर्व श्रेष्ठींच्या समोर मुंडे - गडकरी मतभेद मिटवतील अशी पक्षातील नेत्यांना अपेक्षा आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मुंडेंसाठी पुढचे तीन दिवस वेळ नसल्यामुळे राज्य भाजपमध्ये झालेली दुफळी पुढचे काही दिवस जैसे थे राहणार हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close