S M L

पत्रकारांच्या साखळी उपोषणाला सुरूवात

15 जूनजे.डे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त पत्रकार संघटनांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लॉबीमध्ये हे उपोषण सुरू आहे.यामध्ये आज पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, एस.एम.देशमुख, प्रसाद मोकाशी आणि इतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य बसले आहेत. जे.डे यांच्या हत्येच्या निषेधात सोमवारी पत्रकार कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी एक बैठक ही झाली होती. या बैठकीत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा द्यावा तसेच जे.डे हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी पत्रकारांनी केली होती ही मागणी मान्य झाली नाही तर 15 जूनपासून साखळी उपोषणाचा इशारा पत्रकारांनी दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 11:52 AM IST

पत्रकारांच्या साखळी उपोषणाला सुरूवात

15 जून

जे.डे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त पत्रकार संघटनांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लॉबीमध्ये हे उपोषण सुरू आहे.यामध्ये आज पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, एस.एम.देशमुख, प्रसाद मोकाशी आणि इतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य बसले आहेत.

जे.डे यांच्या हत्येच्या निषेधात सोमवारी पत्रकार कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी एक बैठक ही झाली होती. या बैठकीत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा द्यावा तसेच जे.डे हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी पत्रकारांनी केली होती ही मागणी मान्य झाली नाही तर 15 जूनपासून साखळी उपोषणाचा इशारा पत्रकारांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close