S M L

अण्णांचे 16 ऑगस्टपासून उपोषण

16 जून एक निष्क्रीय लोकपाल तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा डाव आहे .सरकारने आज पर्यंत आपली आणि समस्त देशाची फसवणूक केली आहे. या विरोधात 16 ऑगस्टपासून जंतरमंतरवर पुन्हा उपोषणाला बसणार आहोत अशी घोषणा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा केली. लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकार आणि नागरी समितीत सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोचला आहे. दोन्ही बाजूंनी आज पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर जाहीर हल्लाबोल केला. बाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारने मध्यरात्री चिरडलं या कारवाईचा आम्ही निषेध तर करतोच पण आपल्या आंदोलनात अशी कारवाई करण्याची भीती आहे पण सरकारच्या अशा कारवाईला आपण घाबरत नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण मागे हटणार नाही. आज पर्यंत आयुष्य समाजासाठी वाहिले आहे या पुढे ही समाजासाठीच भ्रष्टाचारविरोधात लढा देत राहील. असं स्पष्ट मत अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सरकारचे लोकपाल म्हणजे जोकपाल असल्याची खिल्ली लोकपाल मसुदा समितीचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केली. यावेळी बैठकीच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्सच्या कॅसेट देण्याची मागणी सरकारने अमान्य केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. सरकार दडपशाही करू शकते पण त्याची पर्वा नाही. असं सांगत 15 ऑगस्ट पर्यंत सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहणार अन्यथा पुन्हा 16 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा नागरी समितीने यावेळी दिला. तर अण्णा हजारे दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप सरकारने केला. सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांना गांभीर्य नाही, नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 30 जूनपर्यंत लोकपालचा मसुदा तयार करणार्‍यावर सरकार कटिबद्ध आहे. पण कोणाच्या दबावाला बळी पडून समांतर सरकार तयार केलं जाऊ शकत नाही असंही सरकारने स्पष्ट केलं. इतर बातम्या 'लोकपाल'चा गुंता वाढला

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 11:54 AM IST

अण्णांचे 16 ऑगस्टपासून उपोषण

16 जून

एक निष्क्रीय लोकपाल तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा डाव आहे .सरकारने आज पर्यंत आपली आणि समस्त देशाची फसवणूक केली आहे. या विरोधात 16 ऑगस्टपासून जंतरमंतरवर पुन्हा उपोषणाला बसणार आहोत अशी घोषणा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा केली.

लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकार आणि नागरी समितीत सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोचला आहे. दोन्ही बाजूंनी आज पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर जाहीर हल्लाबोल केला.

बाबा रामदेव यांचं आंदोलन सरकारने मध्यरात्री चिरडलं या कारवाईचा आम्ही निषेध तर करतोच पण आपल्या आंदोलनात अशी कारवाई करण्याची भीती आहे पण सरकारच्या अशा कारवाईला आपण घाबरत नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण मागे हटणार नाही. आज पर्यंत आयुष्य समाजासाठी वाहिले आहे या पुढे ही समाजासाठीच भ्रष्टाचारविरोधात लढा देत राहील. असं स्पष्ट मत अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

सरकारचे लोकपाल म्हणजे जोकपाल असल्याची खिल्ली लोकपाल मसुदा समितीचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केली. यावेळी बैठकीच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्सच्या कॅसेट देण्याची मागणी सरकारने अमान्य केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. सरकार दडपशाही करू शकते पण त्याची पर्वा नाही. असं सांगत 15 ऑगस्ट पर्यंत सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहणार अन्यथा पुन्हा 16 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा नागरी समितीने यावेळी दिला.

तर अण्णा हजारे दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप सरकारने केला. सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांना गांभीर्य नाही, नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 30 जूनपर्यंत लोकपालचा मसुदा तयार करणार्‍यावर सरकार कटिबद्ध आहे. पण कोणाच्या दबावाला बळी पडून समांतर सरकार तयार केलं जाऊ शकत नाही असंही सरकारने स्पष्ट केलं.

इतर बातम्या

'लोकपाल'चा गुंता वाढला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close