S M L

'ऑलवेज कभी कभी, भेजा फ्राय' रिलीज

16 जूनभेजा फ्राय सिनेमाची आठवण अजून ताजी आहे. आणि पुन्हा एकदा हसवायला आपल्या समोर येतोय भेजा फ्राय 2. विनय पाठक टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून परत आला आहे. भारत भूषणला गायक बनायचंय. तो एक गेम शो जिंकतो आणि बक्षीस म्हणून त्याला एका क्रुझवरची ट्रीप मिळते. तिथं त्याला भेटतो अजित तलवार म्हणजेच के के मेनन. मग उडते एकच धमाल.. सोबत मिनिषा लांबा आणि अमोल गुप्तेही आहेत.तर ऑलवेज कभी कभी सिनेमाही पाहता येईल. हा तरुणांचा सिनेमा. चार टीनेजर्सभोवती हा सिनेमा फिरतोय. चारही जण पहिलं प्रेम, जुने क्रशेस असे अनेक अनुभव घेत पुढे जातायत आणि सिनेमाही. शाहरूख खानच्या कंपनीचं प्रॉडक्शन आहे. रोशन अब्बासचं दिग्दर्शन आहे. आणि तुम्हाला गंभीर विषय पाहायचा असेल तर भिंडी बझारचा चांगला ऑप्शन आहे. के के मेनन आणि दर्जी यांच्यातला गेम तुम्हाला पाहता येईल. मुंबईतील अनेक वादग्रस्त इलाके सिनेमात दाखवलेत. अंकुश भट्टचं दिग्दर्शन आहे. सिनेमात गुन्हेगारी जगाचं वेगळं दर्शन पाहायला मिळतं.छुटंकी हा एक ऍनिमेशन सिनेमाही रिलीज होतोय. छोट्यांसाठीच्या या सिनेमात भरपूर जादू आहेत. वाईट शक्तीविरूद्धचा लढा आहे. सुट्‌ट्या संपल्या असतील तरी वीकेण्डला हा सिनेमा पाहायला छोटे कंपनी आईबाबांबरोबर जाऊ शकते.तर दुसरीकडे हॉलिवूडचा ग्रीन लँटर्न सिनेमा हा एक चांगला ऑप्शन आहे. हॉलिवूडच्या कॉमिक बुकमधली सुपरहिरोची कथा ग्रीन लँटर्नमध्ये पाहायला मिळेल. हा 3डी आहे. यातल्या व्हिज्युअल इफेक्ट्सची सगळीकडे चर्चा आहे. हॉलिवूड सिनेमाच्या निर्मितीत राहुल दाभोळकरचा मोठा वाटा आहे.गेल्या आठवड्यात रिलीज होणारा मराठी सिनेमा राज का रण या आठवड्यात रिलीज होतोय. ठाकरे कुटुंबातील व्यक्तींशी मिळत्याजुळत्या व्यक्तिरेखा या सिनेमात आहेत. प्रसाद ओक, सुदेश म्हशीळकर आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात उगाचंच राजकीय व्यक्तिमत्त्वं कॅश करण्याचा प्रयत्न केलाय की नाही हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. एकूणच रिलीज होणार्‍या सिनेमांची संख्या भरपूर आहे. आता पर्याय निवडण्याचं काम तुमचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 05:55 PM IST

'ऑलवेज कभी कभी, भेजा फ्राय'  रिलीज

16 जून

भेजा फ्राय सिनेमाची आठवण अजून ताजी आहे. आणि पुन्हा एकदा हसवायला आपल्या समोर येतोय भेजा फ्राय 2. विनय पाठक टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून परत आला आहे. भारत भूषणला गायक बनायचंय. तो एक गेम शो जिंकतो आणि बक्षीस म्हणून त्याला एका क्रुझवरची ट्रीप मिळते. तिथं त्याला भेटतो अजित तलवार म्हणजेच के के मेनन. मग उडते एकच धमाल.. सोबत मिनिषा लांबा आणि अमोल गुप्तेही आहेत.

तर ऑलवेज कभी कभी सिनेमाही पाहता येईल. हा तरुणांचा सिनेमा. चार टीनेजर्सभोवती हा सिनेमा फिरतोय. चारही जण पहिलं प्रेम, जुने क्रशेस असे अनेक अनुभव घेत पुढे जातायत आणि सिनेमाही. शाहरूख खानच्या कंपनीचं प्रॉडक्शन आहे. रोशन अब्बासचं दिग्दर्शन आहे.

आणि तुम्हाला गंभीर विषय पाहायचा असेल तर भिंडी बझारचा चांगला ऑप्शन आहे. के के मेनन आणि दर्जी यांच्यातला गेम तुम्हाला पाहता येईल. मुंबईतील अनेक वादग्रस्त इलाके सिनेमात दाखवलेत. अंकुश भट्टचं दिग्दर्शन आहे. सिनेमात गुन्हेगारी जगाचं वेगळं दर्शन पाहायला मिळतं.

छुटंकी हा एक ऍनिमेशन सिनेमाही रिलीज होतोय. छोट्यांसाठीच्या या सिनेमात भरपूर जादू आहेत. वाईट शक्तीविरूद्धचा लढा आहे. सुट्‌ट्या संपल्या असतील तरी वीकेण्डला हा सिनेमा पाहायला छोटे कंपनी आईबाबांबरोबर जाऊ शकते.

तर दुसरीकडे हॉलिवूडचा ग्रीन लँटर्न सिनेमा हा एक चांगला ऑप्शन आहे. हॉलिवूडच्या कॉमिक बुकमधली सुपरहिरोची कथा ग्रीन लँटर्नमध्ये पाहायला मिळेल. हा 3डी आहे. यातल्या व्हिज्युअल इफेक्ट्सची सगळीकडे चर्चा आहे. हॉलिवूड सिनेमाच्या निर्मितीत राहुल दाभोळकरचा मोठा वाटा आहे.

गेल्या आठवड्यात रिलीज होणारा मराठी सिनेमा राज का रण या आठवड्यात रिलीज होतोय. ठाकरे कुटुंबातील व्यक्तींशी मिळत्याजुळत्या व्यक्तिरेखा या सिनेमात आहेत. प्रसाद ओक, सुदेश म्हशीळकर आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात उगाचंच राजकीय व्यक्तिमत्त्वं कॅश करण्याचा प्रयत्न केलाय की नाही हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. एकूणच रिलीज होणार्‍या सिनेमांची संख्या भरपूर आहे. आता पर्याय निवडण्याचं काम तुमचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close