S M L

चंद्रपुरात कुपोषणाचा प्रश्न गंभीर

12 नोव्हेंबर, चंद्रपूरअन्वर शेख, प्रशांत कोरटकरआदिवासी भागात आढळणारं कुपोषित बालकांचं चित्र आता केवळ नंदूरबार किंवा मेळघाटा पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर चंद्रपूर जिल्ह्यातही आता कुपोषित बालकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. एकट्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या बावीस गावातली 29 मुलं कुपोषित आहेत. त्यातही 29 पैकी चार मुलं चौथ्या श्रेणीत तर उर्वरित पंचवीस मुलं तिसर्‍या श्रेणीची आहेत. कुपोषणग्रस्त मेळघाटात सप्टेंबर महिन्यात 90 बालकं कुपोषणानं दगावली .पिंपळकर दाम्पत्याची रोहिणी ही छोटी मुलगी गेल्या अनेक महिन्यांपासून कुपोशीत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या विठ्ठलवाडा या दुर्गम गावात तिचे आई वडील रहातात. त्यांनी अनेक दवाखान्यांमध्ये जाऊन रोहिणीवर उपचार केले पण फरक पडला नसल्यानं त्यांनीही आता हात टेकले आहेत. ' आम्ही खूप डॉक्टरकडे नेऊन आणलं. पण उपयोग झाला नाही. आता आम्ही फक्त दैवाच्या भरोशावर आहोत ' असं रोहिणीचे आई-वडील म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक कुपोषित बालकं आढळली आहेत. एकट्या गांेडपिंपरी तालुक्यातल्या 22 गावात 29 कुपोषित बालकं आढळली आहेत. यातील चार मुलं चौथ्या श्रेणीत तर उर्वरित पंचवीस मुलं तिसर्‍या श्रेणीतील आहेत. गरीबीमुळे आईला आहार नसल्यानं बालकांनाही दुध मिळत नाही. त्यातच या भागात पोषक अन्न मिळत नसल्याची तक्रार आरोग्य अधिकारीच करतात.कुपोषणाच्या मुद्यावर सरकार नेहमीच चालढकल करतांना दिसलं आणि म्हणूनच यामुद्यावर ..बई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानं सरकारला चांगलच खडसावलं. मात्र कुपोषणाचा दर कमी होण्याऐवजी तो तीस टक्क्यांनी वाढला आहे. ' ही कोर्टाच्या आदेशाची सरळ सरळ अवहेलना आहे ', असं उच्च न्यायालयातील वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी सांगितलं.विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये नागपुरात होणार आहे. त्यामुळे कागदीघोडे नाचवून कुपोषणाचे आकडे समोर येऊ नयेत असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. पण या मुलांच्या वेदना शमवण्यासाठी सरकार खरंच प्रयत्न करेल का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 03:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close