S M L

आता तरी भाजपमध्येच - मुंडे

21 जूनमी घामगाळून हा पक्ष उभा केला आहे. याच घरात राहवं अशी माझी इच्छा आहे. जर मला घरातून काढुन टाकले तर कुठे जायाचं याचा पर्याय काय आहे. मी 37 वर्षांपासून पक्षात आहे. पक्षाची 37 वर्षांपासून सेवा केली आज सर्व खासदार,आमदारांना बोलावले पण मला साधं निमंत्रण दिलं नाही या पेक्षा सगळ्यात मोठा अपमान काय असू शकतो अशा शब्दात भाजपचे अस्वस्थ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपली भावना आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली. आज दिवसभर गोपीनाथ मुंडे निर्णय घेणार या दिशेन राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपची विधिमंडळाची बैठक यानंतर मुंडेंच्या वरळी येथील पूर्णा बंगल्यावर झालेली बैठक तर काँग्रेसच्या गोटातून मुख्यमंत्र्यांची दिल्लीकडे कूच या घटनांनी वेगवेगळ्या चर्चांनी ऊतू आला. संध्याकाळी 7:30 च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे दिल्लीला जात असतांना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बातचीत केली. आपण पराकोटीचे नाराज आहोत. जर आपली नाराजी दूर झाली नाही तर मग कोणतंही पाऊल उचलू शकतो असं मत व्यक्त केलं होतं. यानंतर मुंडे 10 वाजता दिल्लीत पोहचले आणि पुन्हा आयबीएन लोकमतकडे आपल्या भावना मोकळ्या केल्या. मुंडे म्हणतात, भाजपाच्या हजारो कोटी कार्यकर्त्याच्या वेदना मी पक्षश्रेष्ठी समोर मांडल्या आहे. पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन योग्य निर्णय द्यावा अशी आपली अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीसाठी मी रक्ताचे पाणी करून पक्ष बहजून समाजमध्ये नेला आहे. त्या बहुजनामध्ये माझ्या नव्हे तर त्यामध्ये असणार्‍या लाखो कार्यकर्त्यांचा सन्मान पार्टीने ठेवावा त्यांचा अपमान करू नये अशी माझी भावना आहे.  जर पार्टी अवमानीत करत असेल तर मी स्वाभिमान शून्यता ठेऊन काम करू शकतं नाही. मी सध्या भाजपमध्येच आहे. मी 27 तारखेच्या पुण्यातील भाजप मेळाव्यावर बहिष्कार टाकला होता तेव्हापासून मी तडफडत आहे भाजप मला न्याय देईल. पण जर भाजपने जर न्याय दिला नाही तर मी पुढील वाटचालीचा विचार करेन. सध्या मी कुठे ही जाण्याचा विचार केला नाही. असं स्पष्ट मत मुंडेंनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.  मुंडे आता पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहे. आपल्या तक्रारींची दखल घेतली नसल्यास आपण भाजप सोडू शकतो, असं मुंडे यांनी सुचवलं. याचा अर्थ मुंडे काँग्रेसमध्येसुद्धा जाऊ शकतात. पण तक्रारींची दखल घेतली तर मुंडे भाजपमध्ये राहू शकतो.  दरम्यान, मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आयबीएन-लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर एक नवी मागणी ठेवली आहे.  त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद हवंय. पण सोनिया गांधी मात्र त्यासाठी तयार नसल्याचे समजतंय. मुंडे यांनी भाजपसमोरही काही मागण्या मांडलेल्या आहेत. त्यांना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची सहानुभूती असल्याचे समजत आहे. एकंदरीत जो कुणी त्यांच्या मागण्या मान्य करेल तिकडे मुंडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंनी अजून भाजप सोडतोय हे अजून आम्हाला कळवलेलं नाही. उद्या काय होतं त्यावर लक्ष ठेवा अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. तर मुंडे रात्री लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. मुंडेंच्या नाराजी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात मुंडेंवर शिस्तभंग कारवाई करण्याचा गडकरी गटाचा डाव होता. पण मुंडे समर्थक आमदारांचा विरोध लक्षात घेऊन बैठकच गुंडाळण्यात आली.सोमवारी बेपत्ता असलेले गोपीनाथ मुंडे मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत, असा दावा त्यांनी केला. आणि भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण, दिल्लीच्या मार्गावर असताना मुंडेंनी आयबीएन-लोकमतशी बातचीत केली. आणि आपण कमालीचे नाराज असल्याचं कबूल केलं. दुसरीकडे मुंडे यांच्या नाराजीमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. पण यात कुठल्याही आमदाराला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. मुंडेंविरोधात शिस्तभंगाचा ठराव मांडण्याचा डाव होता.  पण, मुंडे समर्थक आमदार तो हाणून पाडतील या भीतीपोटी अवघ्या पाच मिनिटांत ही बैठक गुंडाळण्यात आली. त्यानंतर मुंडे यांच्या घरी पुन्हा एकदा भाजप नेत्यांची बैठक झाली. त्यात एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा खडसे यांनी केला.चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला असला तरी, आपली नाराजी अजून दूर झाली नसल्याचे मुंडे यांनीच स्पष्ट केलं. मुंडेंचा लढा थेट पक्षश्रेष्ठींविरोधातच आहे. आणि आतापर्यंत चर्चांच्या पलीकडे काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे मुंडे काय पाऊल उचलतात याविषयीचं गूढ कायम आहे.   

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2011 05:16 PM IST

आता तरी भाजपमध्येच - मुंडे

21 जून

मी घामगाळून हा पक्ष उभा केला आहे. याच घरात राहवं अशी माझी इच्छा आहे. जर मला घरातून काढुन टाकले तर कुठे जायाचं याचा पर्याय काय आहे. मी 37 वर्षांपासून पक्षात आहे. पक्षाची 37 वर्षांपासून सेवा केली आज सर्व खासदार,आमदारांना बोलावले पण मला साधं निमंत्रण दिलं नाही या पेक्षा सगळ्यात मोठा अपमान काय असू शकतो अशा शब्दात भाजपचे अस्वस्थ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपली भावना आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली.

आज दिवसभर गोपीनाथ मुंडे निर्णय घेणार या दिशेन राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपची विधिमंडळाची बैठक यानंतर मुंडेंच्या वरळी येथील पूर्णा बंगल्यावर झालेली बैठक तर काँग्रेसच्या गोटातून मुख्यमंत्र्यांची दिल्लीकडे कूच या घटनांनी वेगवेगळ्या चर्चांनी ऊतू आला. संध्याकाळी 7:30 च्या सुमाराला गोपीनाथ मुंडे दिल्लीला जात असतांना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बातचीत केली. आपण पराकोटीचे नाराज आहोत. जर आपली नाराजी दूर झाली नाही तर मग कोणतंही पाऊल उचलू शकतो असं मत व्यक्त केलं होतं. यानंतर मुंडे 10 वाजता दिल्लीत पोहचले आणि पुन्हा आयबीएन लोकमतकडे आपल्या भावना मोकळ्या केल्या.

मुंडे म्हणतात, भाजपाच्या हजारो कोटी कार्यकर्त्याच्या वेदना मी पक्षश्रेष्ठी समोर मांडल्या आहे. पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन योग्य निर्णय द्यावा अशी आपली अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीसाठी मी रक्ताचे पाणी करून पक्ष बहजून समाजमध्ये नेला आहे. त्या बहुजनामध्ये माझ्या नव्हे तर त्यामध्ये असणार्‍या लाखो कार्यकर्त्यांचा सन्मान पार्टीने ठेवावा त्यांचा अपमान करू नये अशी माझी भावना आहे.

 

जर पार्टी अवमानीत करत असेल तर मी स्वाभिमान शून्यता ठेऊन काम करू शकतं नाही. मी सध्या भाजपमध्येच आहे. मी 27 तारखेच्या पुण्यातील भाजप मेळाव्यावर बहिष्कार टाकला होता तेव्हापासून मी तडफडत आहे भाजप मला न्याय देईल. पण जर भाजपने जर न्याय दिला नाही तर मी पुढील वाटचालीचा विचार करेन. सध्या मी कुठे ही जाण्याचा विचार केला नाही. असं स्पष्ट मत मुंडेंनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

 

मुंडे आता पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहे. आपल्या तक्रारींची दखल घेतली नसल्यास आपण भाजप सोडू शकतो, असं मुंडे यांनी सुचवलं. याचा अर्थ मुंडे काँग्रेसमध्येसुद्धा जाऊ शकतात. पण तक्रारींची दखल घेतली तर मुंडे भाजपमध्ये राहू शकतो.

 

दरम्यान, मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आयबीएन-लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर एक नवी मागणी ठेवली आहे.

 

त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद हवंय. पण सोनिया गांधी मात्र त्यासाठी तयार नसल्याचे समजतंय. मुंडे यांनी भाजपसमोरही काही मागण्या मांडलेल्या आहेत. त्यांना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची सहानुभूती असल्याचे समजत आहे. एकंदरीत जो कुणी त्यांच्या मागण्या मान्य करेल तिकडे मुंडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंनी अजून भाजप सोडतोय हे अजून आम्हाला कळवलेलं नाही. उद्या काय होतं त्यावर लक्ष ठेवा अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. तर मुंडे रात्री लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत.

मुंडेंच्या नाराजी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात मुंडेंवर शिस्तभंग कारवाई करण्याचा गडकरी गटाचा डाव होता. पण मुंडे समर्थक आमदारांचा विरोध लक्षात घेऊन बैठकच गुंडाळण्यात आली.

सोमवारी बेपत्ता असलेले गोपीनाथ मुंडे मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत, असा दावा त्यांनी केला. आणि भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण, दिल्लीच्या मार्गावर असताना मुंडेंनी आयबीएन-लोकमतशी बातचीत केली. आणि आपण कमालीचे नाराज असल्याचं कबूल केलं.

दुसरीकडे मुंडे यांच्या नाराजीमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. पण यात कुठल्याही आमदाराला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. मुंडेंविरोधात शिस्तभंगाचा ठराव मांडण्याचा डाव होता.

 

पण, मुंडे समर्थक आमदार तो हाणून पाडतील या भीतीपोटी अवघ्या पाच मिनिटांत ही बैठक गुंडाळण्यात आली. त्यानंतर मुंडे यांच्या घरी पुन्हा एकदा भाजप नेत्यांची बैठक झाली. त्यात एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा खडसे यांनी केला.

चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला असला तरी, आपली नाराजी अजून दूर झाली नसल्याचे मुंडे यांनीच स्पष्ट केलं. मुंडेंचा लढा थेट पक्षश्रेष्ठींविरोधातच आहे. आणि आतापर्यंत चर्चांच्या पलीकडे काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे मुंडे काय पाऊल उचलतात याविषयीचं गूढ कायम आहे.   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close