S M L

लाचखोर अधिकार्‍याच्या प्रस्तावावरून महापौरांवर टांगती तलवार

22 जूनकल्याणडोंबिवली महापालिकेतून निलंबित केलेले लाचखोर सुनील जोशींना परत घेण्याच्या प्रस्तावावरून शिवसेनेच्या महापालिका नेत्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. महापालिका सभागृह नेते अरविंद मोरे आणि गटनेते अरविंद पोटे या दोघांनाही पद सोडण्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आदेश दिले. तर कडोंमपाच्या महापौर वैजयंती घोलप यांच्यावरही टांगती तलवार आहे. येत्या दोन दिवसांत घोलप यांच्याबद्दल निर्णय होणार असल्याचं समजतंय. कल्याण विभागाचे संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सुनील जोशी याला परत घेण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 03:06 PM IST

लाचखोर अधिकार्‍याच्या प्रस्तावावरून महापौरांवर टांगती तलवार

22 जून

कल्याणडोंबिवली महापालिकेतून निलंबित केलेले लाचखोर सुनील जोशींना परत घेण्याच्या प्रस्तावावरून शिवसेनेच्या महापालिका नेत्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. महापालिका सभागृह नेते अरविंद मोरे आणि गटनेते अरविंद पोटे या दोघांनाही पद सोडण्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आदेश दिले. तर कडोंमपाच्या महापौर वैजयंती घोलप यांच्यावरही टांगती तलवार आहे. येत्या दोन दिवसांत घोलप यांच्याबद्दल निर्णय होणार असल्याचं समजतंय. कल्याण विभागाचे संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सुनील जोशी याला परत घेण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close