S M L

अर्थमंत्रालयातील हेरगिरीच्या चौकशीची भाजपची मागणी फेटाळली

22 जूनकेंद्रीय अर्थमंत्रालयात सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाल्याची घटना उघड झाल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्रालयात हेरगिरी होत असल्याची तक्रार केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे तक्रार केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली होती. अर्थमंत्रालयात 16 महत्त्वाच्या ठिकाणी गुप्त कॅमेरे आणि मायक्रोफोन्स बसवण्यात आल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. अर्थमंत्र्यांचे कार्यालय, त्यांचे सल्लागार आणि खासगी सचिव यांचं कार्यालय तसेच दोन कॉन्फरन्स रूम्समध्ये हे गुप्त कॅमेरे बसवण्यात आले होते. पण, खुद्द प्रणव मुखर्जी यांनीच आता या सर्व गोष्टी बोगस असल्याचे म्हटलं आहे. गुप्तचर संस्थेनं तपास केला. पण त्यात काही आढळलं नसल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, अर्थमंत्रालयात होणार्‍या या हेरगिरीची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर गुप्तचर संस्थेनं क्लीन चिट दिली असल्याने चौकशीची गरज नसल्याचे यूपीए सरकारने म्हटलं आहे. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरच आरोप केला आहे. चिदंबरम यांच्या आदेशानुसारच ही हेरगिरी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 05:23 PM IST

अर्थमंत्रालयातील हेरगिरीच्या चौकशीची भाजपची मागणी फेटाळली

22 जून

केंद्रीय अर्थमंत्रालयात सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाल्याची घटना उघड झाल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्रालयात हेरगिरी होत असल्याची तक्रार केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे तक्रार केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली होती.

अर्थमंत्रालयात 16 महत्त्वाच्या ठिकाणी गुप्त कॅमेरे आणि मायक्रोफोन्स बसवण्यात आल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. अर्थमंत्र्यांचे कार्यालय, त्यांचे सल्लागार आणि खासगी सचिव यांचं कार्यालय तसेच दोन कॉन्फरन्स रूम्समध्ये हे गुप्त कॅमेरे बसवण्यात आले होते.

पण, खुद्द प्रणव मुखर्जी यांनीच आता या सर्व गोष्टी बोगस असल्याचे म्हटलं आहे. गुप्तचर संस्थेनं तपास केला. पण त्यात काही आढळलं नसल्याचं त्यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थमंत्रालयात होणार्‍या या हेरगिरीची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर गुप्तचर संस्थेनं क्लीन चिट दिली असल्याने चौकशीची गरज नसल्याचे यूपीए सरकारने म्हटलं आहे. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरच आरोप केला आहे. चिदंबरम यांच्या आदेशानुसारच ही हेरगिरी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close