S M L

त्या 5 खलाशांना पाकमध्ये जाण्यास परवानगी

23 जूनअल मुर्तजा या इराणी जहाजावरुन अपहरण झालेल्या पाच पाकिस्तानी खलाशांची 12 मार्च रोजी सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यानंतर या खलाशांना मुंबईत तर आणण्यात आलं. पण त्यांना पाकिस्तानात जाता येत नव्हतं कारण त्यासाठी आवश्यक असलेला काऊन्सिलर ऍक्सेस त्यांना मिळत नव्हता. मुंबई पोलिसांनी या खलाशांना स्वदेशी नेण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाला विनंती केलेली होती. पण यानंतर तांत्रिक प्रक्रियेमध्ये बराच विलंब झाला. त्यानंतर केंद्रीय अधिकार्‍यांकडून आलेल्या पत्रात या खलाशांचा उल्लेख चुकीने पाकिस्तानी कैदी असा करण्यात आला होता. आता ही चूक सुधारण्यात आली आणि या खलाशांना आता गृहमंत्रालयाने काऊन्सिलर ऍक्सेसशिवायच पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली. आता या खलाशांची रवानगी दिल्लीला होईल आणि मग त्यांना मायदेशी परत पाठवण्यात येईल. मायदेशी जाण्याचा जरी मार्ग मोकळा झाला असला तरी पूर्ण तांत्रिक बाबी पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी तरी लागणार आहे. कौन्सिल ऍक्सेस करार नेमका कसा आहे ?भारत-पाकिस्तान कौन्सिलर ऍक्सेस करारानुसार 90 दिवसात पकडलेल्या नागरिकांची माहिती संबंधित सरकारला द्यावी लागते. कौन्सिलर ऍक्सेस या सोडवलेल्या पाच पाकिस्तानी खलाशांना लागू होत नाही. केवळ अटकेत असलेले आरोपी, संशयित आरोपी किंवा तपासासाठी ताब्यात घेतलेल्यांनाच तो लागू होतो. संबंधित पाच खलाशी कुठल्याच नियमात बसत नाहीत. त्यामुळे त्यांना तातडीने सोडून देण्याची मागणी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 12:01 PM IST

त्या 5 खलाशांना पाकमध्ये जाण्यास परवानगी

23 जून

अल मुर्तजा या इराणी जहाजावरुन अपहरण झालेल्या पाच पाकिस्तानी खलाशांची 12 मार्च रोजी सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यानंतर या खलाशांना मुंबईत तर आणण्यात आलं. पण त्यांना पाकिस्तानात जाता येत नव्हतं कारण त्यासाठी आवश्यक असलेला काऊन्सिलर ऍक्सेस त्यांना मिळत नव्हता.

मुंबई पोलिसांनी या खलाशांना स्वदेशी नेण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाला विनंती केलेली होती. पण यानंतर तांत्रिक प्रक्रियेमध्ये बराच विलंब झाला. त्यानंतर केंद्रीय अधिकार्‍यांकडून आलेल्या पत्रात या खलाशांचा उल्लेख चुकीने पाकिस्तानी कैदी असा करण्यात आला होता.

आता ही चूक सुधारण्यात आली आणि या खलाशांना आता गृहमंत्रालयाने काऊन्सिलर ऍक्सेसशिवायच पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली. आता या खलाशांची रवानगी दिल्लीला होईल आणि मग त्यांना मायदेशी परत पाठवण्यात येईल. मायदेशी जाण्याचा जरी मार्ग मोकळा झाला असला तरी पूर्ण तांत्रिक बाबी पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी तरी लागणार आहे.

कौन्सिल ऍक्सेस करार नेमका कसा आहे ?

भारत-पाकिस्तान कौन्सिलर ऍक्सेस करारानुसार 90 दिवसात पकडलेल्या नागरिकांची माहिती संबंधित सरकारला द्यावी लागते. कौन्सिलर ऍक्सेस या सोडवलेल्या पाच पाकिस्तानी खलाशांना लागू होत नाही. केवळ अटकेत असलेले आरोपी, संशयित आरोपी किंवा तपासासाठी ताब्यात घेतलेल्यांनाच तो लागू होतो. संबंधित पाच खलाशी कुठल्याच नियमात बसत नाहीत. त्यामुळे त्यांना तातडीने सोडून देण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close