S M L

'ब्लू प्रिंट'च्या शोधात राज चले गुजरात

23 जूनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गुजरात राज्याविषयी कौतुक करणं ही काही नवीन गोष्ट राहीलेली नाही. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून गुजरातचं तोंड भरून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी राज्याचा कसा विकास केला, याबद्दल राज ठाकरे यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. पण आता खुद्द राज ठाकरेच महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर गुजरातला रवाना होणार आहेत. किंवा आपल्या 'ब्लू प्रिंट'साठी गुजरात राज्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत की काय याविषयी चर्चा होत आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना राज ठाकरे यांनी ही घोषणा केली.''मला त्रास होतो शेजारच्या राज्याचा. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं काम करत गुजरात विकासाचे एक एक टप्पे गाठत आहेत. आणि इथं महाराष्ट्रात काय चाललं आहे. याचा कोणीही विचार करत नाही. इथं सगळ्या लोकांची दहा दिशांना दहा ठिकाणी तोंड आहेत.'' असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मनसेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे मत मांडलं होतं.आणि आज औरंगाबादमध्ये, "आजच्या महाराष्ट्राकडं पाहिलं तर महाराष्ट्राच्या विकासाचं कोणालाही काहीही पडलेलं नाही. सरकारकडे तर कोणतीच इच्छाशक्ती उरली नाही. कोणालाही याची गरज वाटत नाही.'' असं सांगून राज ठाकरे यांनी गुजरातला जाण्याचा हेतू स्पष्ट केला. याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. आणि आपण जुलै महिन्यात गुजरात दौर्‍यावर जाणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी राज ठाकरे यांची खास मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये ब्लू प्रिंटबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता आणि तिचं स्वरुप कसे असणार ? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं. राज ठाकरे म्हणाले, 'आज ट्रॅफिक आहे म्हणून एवढा पूल बांधा, मग 10 वर्षांनी कोंडी होणार, मग परत पूल बांधा हे असलं प्लॅनिंग करून चालणार नाही. राज्य मोठं करणं राज्याची प्रगती करणे हे सुधारण्यासाठी कोणतंही रॉकेट सायन्स नाही. जे सहज घडू शकतं आणि जे बाहेरच्या देशांनी, राज्यांनी करून दाखवलं आहे. मग महाराष्ट्र कशात कमी पडतो आहे.' असं उत्तर राज ठाकरे यांनी मुलाखतीत दिलं होतं. आता अचानक राज ठाकरे गुजरात राज्यात जाऊन ब्लू प्रिंट साठी काय काय गोळा करून आणता हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.इतर बातम्या महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 च्या निवडणुकांपूर्वी - राज ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 03:06 PM IST

'ब्लू प्रिंट'च्या शोधात राज चले गुजरात

23 जून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गुजरात राज्याविषयी कौतुक करणं ही काही नवीन गोष्ट राहीलेली नाही. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून गुजरातचं तोंड भरून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी राज्याचा कसा विकास केला, याबद्दल राज ठाकरे यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. पण आता खुद्द राज ठाकरेच महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर गुजरातला रवाना होणार आहेत. किंवा आपल्या 'ब्लू प्रिंट'साठी गुजरात राज्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत की काय याविषयी चर्चा होत आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना राज ठाकरे यांनी ही घोषणा केली.''मला त्रास होतो शेजारच्या राज्याचा. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं काम करत गुजरात विकासाचे एक एक टप्पे गाठत आहेत. आणि इथं महाराष्ट्रात काय चाललं आहे. याचा कोणीही विचार करत नाही. इथं सगळ्या लोकांची दहा दिशांना दहा ठिकाणी तोंड आहेत.'' असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मनसेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे मत मांडलं होतं.आणि आज औरंगाबादमध्ये, "आजच्या महाराष्ट्राकडं पाहिलं तर महाराष्ट्राच्या विकासाचं कोणालाही काहीही पडलेलं नाही. सरकारकडे तर कोणतीच इच्छाशक्ती उरली नाही. कोणालाही याची गरज वाटत नाही.'' असं सांगून राज ठाकरे यांनी गुजरातला जाण्याचा हेतू स्पष्ट केला. याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. आणि आपण जुलै महिन्यात गुजरात दौर्‍यावर जाणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी राज ठाकरे यांची खास मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये ब्लू प्रिंटबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता आणि तिचं स्वरुप कसे असणार ? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं.

राज ठाकरे म्हणाले, 'आज ट्रॅफिक आहे म्हणून एवढा पूल बांधा, मग 10 वर्षांनी कोंडी होणार, मग परत पूल बांधा हे असलं प्लॅनिंग करून चालणार नाही. राज्य मोठं करणं राज्याची प्रगती करणे हे सुधारण्यासाठी कोणतंही रॉकेट सायन्स नाही. जे सहज घडू शकतं आणि जे बाहेरच्या देशांनी, राज्यांनी करून दाखवलं आहे. मग महाराष्ट्र कशात कमी पडतो आहे.' असं उत्तर राज ठाकरे यांनी मुलाखतीत दिलं होतं. आता अचानक राज ठाकरे गुजरात राज्यात जाऊन ब्लू प्रिंट साठी काय काय गोळा करून आणता हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

इतर बातम्या

महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 च्या निवडणुकांपूर्वी - राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close