S M L

अंधश्रध्देचा पगडा ;कुंडातील पाणी प्यायलं की आजार गायब होतो !

24 जूनआपण जरी 21 व्या शतकात असलो लोकांवर अंधश्रध्देचा अजून मोठा पगडा आहे. काही आजार बरं करणं हे आजच्या प्रगत मेडिकल सायन्सलाही आव्हानात्मक आहे. पण असे आजार बामोशीबाबा म्हणजेच पीर मुसरा कादरी यांच्या दर्ग्यात बरे होतात असा समज आहे. जळगांव जिल्ह्यातल्या चाळीसगावात बामोशीबाबाच्या दर्ग्यावर सध्या उरुस सुरू आहे. सामाजिक ऐक्य आणि सलोखा यांचं प्रतिक म्हणून असलेल्या या दर्ग्याच्या लाखो भाविक इथं येतात. इथं येऊन दर्शन घेतलं दर्ग्याजवळच्या कुंडातील पाणी प्यायलं की आजार गायब होतो अशी अंधक्षद्धा आहे. केस मोकळे सोडून बेभान होऊन नाचत दर्ग्याजवळ जाणार्‍या या महिलांच्या अंगात येतं. भूत पिशाच्च यांची बाधा या दर्ग्याजवळचं पाणी काढतं अशी समजूत आहे. याच दर्ग्याची एक महत्वाची परंपरा म्हणजे तलवारीचा उरुस. गावातल्या देशमुखांच्या घरुन वाजत गाजत ही तलवार या दर्ग्यावर आणतात आणि दर्ग्यावर चढवलेल्या चादरीखाली ठेवलेली ही तलवार अचानक मोठी होऊन गायब होते. आणि पुन्हा देशमुखांच्या घरी जाते अशीही भाविकांची समजूत आहे. असं म्हणतात की गेल्या 200 वर्षांपासून हा अंधश्रध्देचा खेळ या जागी खेळला जातो. आणि त्याला साक्षीदार असतात चक्क पोलीस.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 12:53 PM IST

अंधश्रध्देचा पगडा ;कुंडातील पाणी प्यायलं की आजार गायब होतो !

24 जून

आपण जरी 21 व्या शतकात असलो लोकांवर अंधश्रध्देचा अजून मोठा पगडा आहे. काही आजार बरं करणं हे आजच्या प्रगत मेडिकल सायन्सलाही आव्हानात्मक आहे. पण असे आजार बामोशीबाबा म्हणजेच पीर मुसरा कादरी यांच्या दर्ग्यात बरे होतात असा समज आहे. जळगांव जिल्ह्यातल्या चाळीसगावात बामोशीबाबाच्या दर्ग्यावर सध्या उरुस सुरू आहे.

सामाजिक ऐक्य आणि सलोखा यांचं प्रतिक म्हणून असलेल्या या दर्ग्याच्या लाखो भाविक इथं येतात. इथं येऊन दर्शन घेतलं दर्ग्याजवळच्या कुंडातील पाणी प्यायलं की आजार गायब होतो अशी अंधक्षद्धा आहे. केस मोकळे सोडून बेभान होऊन नाचत दर्ग्याजवळ जाणार्‍या या महिलांच्या अंगात येतं. भूत पिशाच्च यांची बाधा या दर्ग्याजवळचं पाणी काढतं अशी समजूत आहे.

याच दर्ग्याची एक महत्वाची परंपरा म्हणजे तलवारीचा उरुस. गावातल्या देशमुखांच्या घरुन वाजत गाजत ही तलवार या दर्ग्यावर आणतात आणि दर्ग्यावर चढवलेल्या चादरीखाली ठेवलेली ही तलवार अचानक मोठी होऊन गायब होते. आणि पुन्हा देशमुखांच्या घरी जाते अशीही भाविकांची समजूत आहे. असं म्हणतात की गेल्या 200 वर्षांपासून हा अंधश्रध्देचा खेळ या जागी खेळला जातो. आणि त्याला साक्षीदार असतात चक्क पोलीस.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close