S M L

एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूने हल्ला

24 जूनमुलूंडमध्ये 12 वीत शिकणार्‍या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू चे वार करण्यात आला आहे. मंगेश देशमुख नावाच्या तरुणाने तिच्यावर वार केले. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी जात असताना मंगेशने रस्त्यात गाठून चाकूने मानेवर वार केले. सध्या या युवतीला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगेशने तिला लग्नासाठी मागणी घातली होती पण तिनं आणि तिच्या घरच्यांनी त्याला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन मंगेशनं हा हल्ला केला. दोघेही ठाण्याच्या वागळे इस्टेट इथं राहणारे आहेत. मंगेश सध्या फरार असून त्याच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 04:51 PM IST

एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूने हल्ला

24 जून

मुलूंडमध्ये 12 वीत शिकणार्‍या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू चे वार करण्यात आला आहे. मंगेश देशमुख नावाच्या तरुणाने तिच्यावर वार केले. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी जात असताना मंगेशने रस्त्यात गाठून चाकूने मानेवर वार केले. सध्या या युवतीला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगेशने तिला लग्नासाठी मागणी घातली होती पण तिनं आणि तिच्या घरच्यांनी त्याला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन मंगेशनं हा हल्ला केला. दोघेही ठाण्याच्या वागळे इस्टेट इथं राहणारे आहेत. मंगेश सध्या फरार असून त्याच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close