S M L

आणीबाणीला आज 36 वर्षं पूर्ण

25 जूनदेशात आणीबाणी पुकारली गेली त्याला आज 36 वर्षं पूर्ण होत आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा लोकशाहीवर घातलेला घाला होता. देशात ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे अनेक प्रयत्न तत्कालीन केंद्र सरकारकडून केले गेले. अखेर जनतेच्या वाढत्या क्षोभाला तोंड देता येईना तेव्हा इंदिरा गांधी यांनी 24 जून 1975 च्या मध्यरात्री पासून देशात आणीबाणी लागू केली. त्याच दिवशी सुरू झालेल्या अटकसत्रात जयप्रकाश नारायण आणि असंख्य नेत्यांना देशभर ताब्यात घेतलं गेलं. वृत्तपत्रांवर सरकारी धोरणांविरोधात लिहायला बंदी घातली गेली. अविष्कार स्वातंत्र्यावरचा हा घाला आहे असंच याबद्दल म्हटलं गेलं होतं. अखेर गांधींना 1977 मध्ये ही आणीबाणी जनतेच्या सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनापुढे मागे घ्यावी लागली. जनतेच्या लोकशाही स्वातंत्र्याचा विजय झाला. याच लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण यापुढेही कटीबद्ध राहूयात.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 11:55 AM IST

आणीबाणीला आज 36 वर्षं पूर्ण

25 जून

देशात आणीबाणी पुकारली गेली त्याला आज 36 वर्षं पूर्ण होत आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा लोकशाहीवर घातलेला घाला होता. देशात ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे अनेक प्रयत्न तत्कालीन केंद्र सरकारकडून केले गेले.

अखेर जनतेच्या वाढत्या क्षोभाला तोंड देता येईना तेव्हा इंदिरा गांधी यांनी 24 जून 1975 च्या मध्यरात्री पासून देशात आणीबाणी लागू केली. त्याच दिवशी सुरू झालेल्या अटकसत्रात जयप्रकाश नारायण आणि असंख्य नेत्यांना देशभर ताब्यात घेतलं गेलं. वृत्तपत्रांवर सरकारी धोरणांविरोधात लिहायला बंदी घातली गेली.

अविष्कार स्वातंत्र्यावरचा हा घाला आहे असंच याबद्दल म्हटलं गेलं होतं. अखेर गांधींना 1977 मध्ये ही आणीबाणी जनतेच्या सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनापुढे मागे घ्यावी लागली. जनतेच्या लोकशाही स्वातंत्र्याचा विजय झाला. याच लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण यापुढेही कटीबद्ध राहूयात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close