S M L

मायावतींचे आज मायानगरीत शक्तीप्रदर्शन

26 जूनउत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती सध्या मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या मार्गदर्शन करतील. शिवशक्ती-भिमशक्ती युती झाल्यानंतर मायावतींच्या या दौर्‍याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्या दृष्टीनंही त्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.दरम्यान काल मायावती यांनी चेंबूरमधील बहुजन समाज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी घटनांवर बोट ठेवलं. पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणे हत्याकांडाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात बलात्कार आणि हत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यावरून मायावती सरकार अडचणीत आलंय. असं असताना मायावतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 10:16 AM IST

मायावतींचे आज मायानगरीत शक्तीप्रदर्शन

26 जून

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती सध्या मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या मार्गदर्शन करतील. शिवशक्ती-भिमशक्ती युती झाल्यानंतर मायावतींच्या या दौर्‍याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्या दृष्टीनंही त्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान काल मायावती यांनी चेंबूरमधील बहुजन समाज पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी घटनांवर बोट ठेवलं. पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणे हत्याकांडाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात बलात्कार आणि हत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यावरून मायावती सरकार अडचणीत आलंय. असं असताना मायावतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close